एक्स्प्लोर

Doctor Sejal Pawar Controversial Comment In Pranit More Show: प्रणित मोरेच्या शोमध्ये डॉक्टर तरुणीचं अश्लील बोलणं, ट्रोल झाल्यानंतर व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

Doctor Sejal Pawar Controversial Comment In Pranit More Show: डॉक्टर सेजल पवार हिचा प्रणित मोरेच्या शोमधला आक्षेपार्ह्य व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता तिनं माफी मागितली आहे.

Doctor Sejal Pawar Controversial Comment In Pranit More Show: '370 रुपयांची बिर्याणी'चा (370 Rupees Biryani Controversy) प्रणित मोरेच्या शोमधला हिमांशु जांगडाचा (Himanshu Jangra) एपिसोड व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर मोठा गदारोळ झाला. नेटकऱ्यांनी हिमांशु जांगडाला झोडपलंच, पण त्यासोबतच प्रणित मोरेसुद्धा (Pranit More) टीकेचा धनी झाला. प्रणित मोरेच्या शोमध्ये '370 रुपयांच्या बिर्याणी'च्या केलेल्या वक्तव्यामुळे हिमाशु जांगडाला आपली नोकरीसुद्धा गमवावी लागली. त्यानंतर प्रणित मोरेनं निवेदन जाहीर करुन माफीसुद्धा मागितली. पण, तेवढ्यातच प्रणित मोरेच्या शोमधला आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला. केईमच्या एका डॉक्टर तरुणीनं कॉमेडी शोदरम्यान पुरुषांच्या मृतदेहांच्या गुप्तांगांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्यानंतर नेटकऱ्यांनी तिलाही फैलावर घेतलं. प्रणित मोरेनं आपलं इन्स्टा अकाउंटच सस्पेन्ड केलं. तर, गंभीर अडचणीनंतर डॉक्टर सेजल पवार (Dr. Sejal Pawar) हिनं जाहीर माफी मागितली आहे. 

आपल्या बचावात डॉक्टर आणि इन्फ्लुएन्सर असलेल्या सेजलनं सांगितलं की, तो तिचा पहिलाच कॉमेडी शो होता आणि तीन महिन्यांपूर्वी केलेल्या एका वक्तव्याचं इतकं मोठं प्रकरण होईल, याची तिला कल्पनाही नव्हती. या प्रकरणावर झालेल्या तीव्र टीकेनंतर सेजलनं इन्स्टाग्राम अकाउंट प्रायव्हेट केलंय. 

डॉक्टर सेजल पवार हिनं माफी मागणारा एक व्हिडीओ शेअर केलाय. तिनं प्रणित मोरेच्या शोमध्ये मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्ट्सवर आक्षेपार्ह्य टिप्पणी केलेली. त्यावरुन मोठा गदारोळ झाल्यामुळे तिनं आता आपली बाजू मांडत माफी मागणारा एक व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडीओमध्ये डॉ. सेजल पवार म्हणाली आहे की, "मी तीन महिन्यांपूर्वी एक शो केलेला, त्या व्हिडीओतली एक क्लिप खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मी एक गोष्ट बोललेली, माझ्या वक्तव्यामुळं अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, याची मला जाणीव आहे. मी कोणत्याही हेतूपूर्वक ते वक्तव्य केलेलं नाही. एक डॉक्टर म्हणून मी मृतदेहांचा आणि वैद्यकीय पेशाचा आदर करायला हवा होता. माझ्याकडून अनावधानानं आणि विनोदाच्या ओघात अत्यंत चुकीचं वक्तव्य झाले. मी माझ्या कृत्याबद्दल मनापासून माफी मागते आणि भविष्यात अशी चूक होणार नाही, याची ग्वाही देते..." 

नेमकं काय म्हणाली डॉक्टर सेजल? (Doctor Sejal Pawar Apology Video)

"नमस्कार सर्वांना. तीन महिन्यांपूर्वी मी केलेल्या एका शोमधील एक क्लिप सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मी केलेले एक वक्तव्य आहे. त्याबद्दल मी माफी मागते, ते पूर्णपणे चुकीचं होतं... मी अत्यंत अयोग्य असं काहीतरी बोलले होते. तसं बोलण्याचा माझा कधीच उद्देश नव्हता किंवा मी तसं बोलेन अशी कल्पनाही केली नव्हती. शोच्या सुरुवातीलाच मी दोनदा स्पष्ट केलं होतं की, मृत व्यक्तीबद्दल आम्हाला अत्यंत आदर आहे... हा माझा पहिलाच कॉमेडी शो होता, यापूर्वी मी कधीही 'स्टँड-अप' परफॉर्म केलं नव्हतं आणि मला अजिबात कल्पना नव्हती की, दोन महिन्यांपूर्वीची ती क्लिप पुन्हा समोर येईल आणि त्याचं इतकं मोठं प्रकरण होईल. मी कोणतीही सबब सांगण्याचा प्रयत्न करत नाहीये, मी केवळ माफी मागतेय, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला जावा किंवा ते संदर्भाबाहेर घेतलं जावं, अशी माझी इच्छा नाही. मी तुम्हाला खात्री देतो की, अशी गोष्ट पुन्हा कधीही घडणार नाही..."

"मला परिस्थितीचे गांभीर्य पूर्णपणे समजलं नव्हतं. जर तुम्ही तो संपूर्ण व्हिडीओ पाहिला, तर तुमच्या लक्षात येईल की, शेवटी मी एक गाणंही गायलं होतं, तिथे बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या. तरीही, त्या एका विशिष्ट गोष्टीबद्दल सांगायचं तर, एक जबाबदार व्यक्ती म्हणून मी तसं बोलायला नको होतं... मला त्याबद्दल पश्चात्ताप होतोय, मी वचन देते की, असं पुन्हा कधीही घडणार नाही. मला कधीच असं वाटत नाही की, तुम्ही मला त्या रूपात पहावं..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Doctor Sejal Pawar Controversial Comment In Pranit More Show: KEM ची डॉक्टर तरुणी, मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्ट्सवर नको ते बरळली; कधीकाळी दोन प्रसिद्ध क्रिकेटर्सची होती गर्लफ्रेंड? 'ते' चॅट्स व्हायरल

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget