'खंडणी द्या नाहीतर...' लहानपणी अपहरण टळलं, सलमान खानकडून अभिनय शिकली; ही राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कोण आहे?
बॉलीवूडमधील बहुमुखी अभिनेत्री दिव्या दत्ता आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकतात. पण पडद्यामागे त्यांच्या आयुष्यातही काही भन्नाट आणि थरारक अनुभव आहेत.

Bollywood: बॉलिवूडमध्ये दोन प्रकारच्या अभिनेत्री दिसतात,एक ज्या कायम लाइमलाइटमध्ये राहायला आवडतात, आणि दुसऱ्या त्या ज्या आपल्या अभिनयाच्या ताकदीवर, संजीव आणि प्रभावी भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडतात. अशाच एक बहुगुणी अभिनेत्री म्हणजे दिव्या दत्ता (Divya Dutta ). त्यांच्या अभिनय कौशल्याचं कौतुक अनेक दिग्गज कलाकारांनी केलं आहे. मग ते पंजाबी गायक-कलाकार गुरदास मान असोत, महानायक अमिताभ बच्चन असोत किंवा सलमान खान, शाहरुख खान, वरुण धवन आणि मनोज बाजपेयीसारखे स्टार्स.. सगळ्यांनाच दिव्या दत्तासोबत काम करायला आवडतं. बॉलीवूडमधील बहुमुखी अभिनेत्री दिव्या दत्ता आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकतात. पण पडद्यामागे त्यांच्या आयुष्यातही काही भन्नाट आणि थरारक अनुभव आहेत. आपल्या ‘मी अँड मां’ या पुस्तकात दिव्याने बालपणीच्या एका धक्कादायक घटनेचा उल्लेख केला आहे.
खंडणी मागणारं एक धमकीचं पत्र
दिव्या लहान असताना तिचे वडील डॉक्टर होते, पण ती केवळ सात वर्षांची असतानाच वडिलांचं निधन झालं. त्यामुळे आईनेच दिव्या आणि तिच्या भावाचं संगोपन केलं. त्या काळात दिव्या एका गावात राहत होती. अचानक एका संध्याकाळी त्यांच्या घरी खंडणी मागणारं एक धमकीचं पत्र आलं. त्यात स्पष्ट लिहिलं होतं की पैसे न दिल्यास डॉक्टरची मुलं म्हणजेच दिव्या आणि तिचा भाऊ पळवले जातील. हे वाचून घरात प्रचंड धास्ती निर्माण झाली.मात्र, दिव्याची आई खचली नाही. तिने ताबडतोब पोलिसांना माहिती दिली. एवढंच नाही, तर गावकरीही त्यांच्या मदतीला धावून आले.
दिव्याच्या आईने पूर्वी अनेक लोकांचे प्राण वाचवले होते, त्यामुळे गावकरी तिच्यासोबत उभे राहिले. पोलिस आणि शेजाऱ्यांसोबत तिने त्या पत्रात दिलेल्या पत्त्यावर जाऊन सापळा लावला. दरम्यान सुरक्षिततेसाठी दिव्या आणि तिच्या भावाला नानीकडे ठेवण्यात आलं. काही तासांनंतर आई सुरक्षित परतल्यावर दिव्याने सुटकेचा श्वास घेतला. हा प्रसंग त्यांच्या आयुष्यातील खऱ्या अर्थाने फिल्मी सीन ठरला.
सलमान खानने शिकवली होती मरायची अॅक्टिंग
याशिवाय दिव्याने आपल्या करिअरमधील एक गमतीदार किस्साही सांगितला आहे. ‘वीरगती’ चित्रपटात सलमान खानसोबत काम करताना तिला “मरायची अॅक्टिंग” करता येत नव्हती. दिग्दर्शक तिला श्वास रोखायला सांगत होते, पण ते जमेनासं झालं. अखेर सलमान खानने स्वतः तिला “मरायची अॅक्टिंग” कशी करायची हे शिकवलं.























