Divya Bharti : 18 व्या वर्षी दिव्या भारतीनं साजिद नाडियाडवालासोबत बांधली लग्नगाठ; लग्नाच्या 11 महिन्यांनी झालं होत्याचं नव्हतं
Divya Bharti Bollywood Actress: फार कमी वयात लोकप्रिय ठरलेली दिव्या भारती ही अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. जाणून घेऊयात दिव्याबाबत...
Divya Bharti Bollywood Actress : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या भारतीला (Divya Bharti) तिच्या अभिनयामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. दिव्यानं 16 व्या वर्षी अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरूवात केली. अनेक हिट चित्रपटांमध्ये दिव्यानं प्रमुख भूमिका साकारली. फार कमी वयात लोकप्रिय ठरलेली ही अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. जाणून घेऊयात दिव्याबाबत...
दिव्याचं बॉलिवूडमधील करिअर
दिव्यानं वयाच्या 16 व्या वर्षी अभिनय क्षेत्रामधीस करिअर करण्यास सुरूवात केली. 'बोब्बिली राजा' या तेलुगु चित्रपटामधून तिनं अभिनय क्षेत्रातमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिनं बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तिच्या विश्वात्मा या चित्रपटामधील सात समुंदर पार मै तेरे पीछे-पीछे आ गई या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. लोक आजही ते गाणं आवडीनं ऐकतात. शोला और शबनम आणि दीवाना हे दिव्याचे चित्रपट हिट ठरले.
18 व्या वर्षी दिव्यानं केलं लग्न
दिव्या आणि साजिद नाडियालवाला यांचे लग्न 10 मे 1992 रोजी झाले. तेव्हा दिव्या 18 वर्षाची होती. शोला और शबनम या चित्रपटाच्या सेटवर दिव्या आणि साजिदची ओळख झाली. रिपोर्टनुसार लग्नानंतर साजिदनं दिव्याचं नाव बदलून 'सना' असं केलं होतं.
19 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
वयाच्या 19 व्या वर्षी दिव्यानं अखेरचा श्वास घेतला. 5 एप्रिल 1993 रोजी तिचे निधन झाले. तेव्हा दिव्याच्या लग्नाला केवळ 11 महिने झाले होते. रिपोर्टनुसार, तिचे घर पाचव्या मजल्यावर होते. तेथून पडल्यामुळे दिव्याचा मृत्यू झाला.
संबंधित बातम्या
- Salman Khan ला हायकोर्टाचा मोठा दिलासा, अंधेरी दंडाधिकारी कोर्टाच्या समन्सला 5 मेपर्यंत स्थगिती
- Alia Bhatt,Ranbir Kapoor : आलिया आणि रणबीरच्या लग्नाआधी खास बॅचलर पार्टीचं प्लॅनिंग; 'हे' सेलिब्रिटी होणार सहभागी
- RRR Box Office Collection : आमिर खान अन् रजनीकांत यांच्या चित्रपटांना पछाडत आरआरआरची कोट्यवधींची कमाई; पाहा बॉक्स ऑफिस कलेक्शन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha