एक्स्प्लोर

Naal 2 : नागराज मंजुळेंचा ‘नाळ 2’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावर केली चित्रपटाची घोषणा!

Naal 2 : दोन वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘नाळ’ (Naal 2) या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. या चित्रपटातील चिमुकल्या ‘चैत्या’ने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली होती.

Naal 2 : दोन वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘नाळ’ (Naal) या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. या चित्रपटातील चिमुकल्या ‘चैत्या’ने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. आता या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी त्यांच्या ‘नाळ 2’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नागराज मंजुळे यांनी ही माहिती दिली आहे.

‘नाळ 2’ची (Naal 2) घोषणा करताना नागराज मंजुळे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी ‘नाळ’ चित्रपटाच्या स्टारकास्टचा फोटो शेअर केला आहे. ‘नाळ 2’च्या नावाने चांगभलं म्हणत त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

पाहा पोस्ट :

काय म्हणाले नागराज मंजुळे?

‘मागच्या महिन्यात सुधाकरने अचानक फोन करून सांगितलं की नाळचा दुसरा भाग लिहिलाय. ऐकवायला कधी भेटुयात? नाळचा दुसरा भाग काय होऊ शकतो, याबाबत माझ्याही मनात उत्सुकता तयार झाली. स्क्रिप्ट ऐकली ती इतकी अनपेक्षित तरीही सहज नि भारी होती की, दोन महिन्यांच्या जय्यत तयारीनिशी फिल्मचं शूटिंग झटक्यात सुरू केलं. पहिल्या ‘नाळ’ प्रमाणेच 'नाळ'चा दुसरा भागही संस्मरणीय होईल अशी आशा आहे! ‘नाळ 2’ नावानं चांगभलं!!!’, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

‘नाळ’ने राष्ट्रीय पुरस्कारांवर कोरले नाव

‘नाळ’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. केवळ प्रेक्षकच नव्हे, तर या चित्रपटाने समीक्षकांचीही वाहवा मिळवली होती. 66व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये या चित्रपटाने बाजी मारत दोन पुरस्कार पटकावले होते. या चित्रपटातल्या 'चैत्या'ची भूमिका साकारणाऱ्या श्रीनिवास पोफळे याला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार जाहीर झाला होता. तर, याच चित्रपटासाठी दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळवला होता. आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने चाहते देखील उत्सुक झाले आहेत.

नागराज मंजुळे यांचं अभिनयात पदार्पण

‘नाळ’ या चित्रपटातून दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी अभिनय विश्वात पदार्पण केले होते. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या 'नाळ' या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात तब्बल 14 कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘नाळ’ या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री देविका दफ्तरदार आणि बालकलाकार श्रीनिवास पोकळे हे मायलेकाच्या भूमिकेत झळकले होते.    

हेही वाचा :

प्रेक्षकांशी 'नाळ' जुळली, पहिल्या आठवड्यातील कमाई...

मला दत्तक दिलेलं, 'नाळ'ची कथा माझ्याशी मिळती-जुळती : नागराज मंजुळे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik BJP-NCP Rada | नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राडा, शरद पवार-भाजपचे कार्यकर्ते आमने-सामनेBaramati Vidhan Sabha Election | पवार VS पवार बारामतीत कुणाची? स्थानिक पत्रकारांना काय वाटतं?Zero Hour Guest Centre : विधानसभेसाठी मविआचे कोणते मुद्दे चर्चेत? जिकंणार कोण?Zero Hour Rahul Gandhi | प्रचाराचा शेवटचा दिवस, एक है तो मोदी-अदानी सेफ है, राहुल गांधींची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget