एक्स्प्लोर

Dharmendra Most Handsome Man In The World: जगभरात 'सर्वात हँडसम पुरूष' म्हटलं, तर काहींनी थेट 'या' हॉलिवूड अभिनेत्याशी केलेली तुलना; 'ही-मॅननं'नं सांगितलेला 'तो' किस्सा

Dharmendra Most Handsome Man In The World: धर्मेंद्र यांना त्यांची प्रभावी शरीरयष्टी आणि अ‍ॅक्शन-मॅन व्यक्तिरेखेसाठी बॉलिवूडचा 'ही-मॅन' म्हणून ओळखलं जातं. पण, फारच कमी लोकांना माहीत आहे की, त्यांनी त्यांच्या सिनेक्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात एक रोमँटिक स्टार म्हणून केली.

Dharmendra Most Handsome Man In The World: सिनेसृष्टीवर तब्बल सहा दशकं राज्य करणाऱ्या धर्मेंद्र यांनी जगाचा निरोप घेतला आणि अवघी सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली. जुहू येथील आपल्या राहत्या घरी धर्मेंद्र यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं जाणं देशभरातील त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या मनाला चटका लावणारं आहे. एकदम झोकात पडद्यावर एन्ट्री घेणारा 'ही-मॅन' आजही लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत होता. 

धर्मेंद्र यांना त्यांची प्रभावी शरीरयष्टी आणि अ‍ॅक्शन-मॅन व्यक्तिरेखेसाठी बॉलिवूडचा 'ही-मॅन' म्हणून ओळखलं जातं. पण, फारच कमी लोकांना माहीत आहे की, त्यांनी त्यांच्या सिनेक्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात एक रोमँटिक स्टार म्हणून केली. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात, 60 आणि 70 च्या दशकाच्या सुरुवातीला, त्यांना उद्योगातील सर्वात सुंदर अभिनेत्यांपैकी एक मानलं जायचं. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी या दाव्याला आणखी बळकटी दिली, ज्यामुळे त्यांना 'जगातील सर्वात देखणा पुरूष' (Most Handsome Man In The World) म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

...जेव्हा धर्मेंद्र यांना जगातील सर्वात हँडसम व्यक्ती म्हटलं गेलं

धर्मेंद्र यांनी आपल्या करियरची सुरुवात अनेक रोमँटिक आणि ड्रामा फिल्म्समधून केली. धर्मेंद्र यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात 'अनुपमा' (1969), 'बहरें फिर भी आयेंगी' (1966), 'काजल' (1965) आणि 'मेरा गाव मेरा देश' (1971) यासारख्या अनेक रोमँटिक चित्रपटांमध्ये काम करून केली, ज्यामुळे त्यांची रोमँटिक अभिनेता म्हणून ओळख बनली. मीना कुमारी यांच्यासोबतची त्यांची जोडी विशेष लोकप्रिय ठरली. 1970 च्या दशकापर्यंत, धर्मेंद्र यांनी अखेर इंडस्ट्रीमध्ये आपले पाय रोवले आणि लिडिंग मॅन म्हणून स्वतःला प्रस्थापित केलं. 

त्याकाळत फक्त भारतातच नाहीतर संपूर्ण जगभरातील मासिकांमध्ये धर्मेंद्र यांची दखल घेतली गेली. 1970 च्या दशकात, आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्सनी जगातील टॉप 10 आणि टॉप 5 सर्वात देखण्या पुरुषांमध्ये धर्मेंद्र यांना स्थान दिलं. तर, काही मासिकांनी तर धर्मेंद्र यांचा उल्लेख 'जगातील सर्वात देखणा पुरूष' असा केलेला. 

जेव्हा धर्मेंद्रंशी केलेली हॉलिवूड स्टार्सची तुलना 

धर्मेंद्र यांनी स्वतः एका मुलाखतीत बोलताना सांगितलेलं की, एक काळ होता, ज्यावेळी त्यांची तुलना त्यावेळच्या 'हॉलीवुड हार्टथ्रोब', सारख्या जेम्स डीन आणि पॉल न्यूमॅनशी केलेली. लेहरेन रेट्रोला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत बोलताना त्यांनी सांगितलेलं की, "काही लोकांनी माझी तुलना एका हॉलिवूड स्टारशी केलेली, पण मी त्याचा एकही सिनेमा पाहिलेला नव्हता... मग मी गेलो आणि त्याचे सिनेमे पाहिले आणि मग मलाही असं वाटलं की, कदाचित एका बाजूनं मी थोडासा त्यांच्यासारखा दिसतोय. मग मलाही स्वतःलाही असंच काहीसं वाटू लागलेलं..."

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Embed widget