Kangana Ranaut : काही दिवसांपूर्वी मोठा आर्थिक फटका, आता कोट्यवधींची खरेदी; खासदार झाल्यानंतर कंगनाने तीन महिन्यांतच घेतली आलिशान कार
Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रणौत हिने एक आलिशान कार खरेदी केली असल्याचं पाहायला मिळत आहे.
![Kangana Ranaut : काही दिवसांपूर्वी मोठा आर्थिक फटका, आता कोट्यवधींची खरेदी; खासदार झाल्यानंतर कंगनाने तीन महिन्यांतच घेतली आलिशान कार Kangana Ranaut buys new luxury car worth ₹3 crore after selling Mumbai bungalow Bollywood News in Marathi Kangana Ranaut : काही दिवसांपूर्वी मोठा आर्थिक फटका, आता कोट्यवधींची खरेदी; खासदार झाल्यानंतर कंगनाने तीन महिन्यांतच घेतली आलिशान कार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/30/0344f4b4a3d38750b2a80f1e495583b41727694347258720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kangana Ranaut New Car : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) ही खासदार झाल्यापासून अनेक मुद्द्यांमुळे वारंवार चर्चेत आहे. चंदीगड विमानतळावर कानशिलात लगावणं प्रकरण असो किंवा शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरचं बोलणं असो या सगळ्यामुळे कंगना रणौत हे नाव सध्या चर्चेचा विषय झालाय. इतकच नव्हे तर कंगना इर्मजन्सी हा सिनेमा देखील वादाच्या भोवऱ्यात असून अजूनही या सिनेमाला प्रदर्शनाची तारीख मिळाली नाही. त्यातच आता पुन्हा एकदा एका वेगळ्या मुद्द्यावरुन कंगना चर्चेत आली आहे.
कंगनाने नुकतीच एक आलिशान कार खरेदी केलीये. सोशल मीडियावर कंगनाच्या या कारचे फोटो व्हायरल होत आहेत. खासदार झाल्यानंतर कंगनाने ही खरेदी केली असून ही कार कोट्यवधि रुपयांच्या किंमतीची आहे. कंगनानेकडे बऱ्याच आलिशान कारचं कलेक्शन सध्या आहे. त्यातच आता कंगनाने आणखी एक कार खरेदी केली आहे.
कंगनाची नवी कार
कंगनाने रेंज रोव्हर या कारची खरेदी केली असल्याची माहिती समोर आलीये. त्याचप्रमाणे या कारची किंमत ही जवळपास 3 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं आहे. इर्मजन्सीला रिलीज डेट मिळत नसल्यामुळे कंगनाला मोठा आर्थिक फटका बसला असल्याचं म्हटलं जातंय. त्याचसाठी तिने तिचं मुंबईतलं ऑफिस 32 कोटी रुपयांना विकलं असल्याची माहितीही समोर आलीये. त्यानंतर आता कंगनाने तिची ही आलिशान कार खरेदी केली.
पालिकेनं बुलडोझर चालवलेला बंगला स्वस्तात विकला
दरम्यान, कंगना रणौतच्या पाली हिल येथील बंगल्यावर मुंबई महानगर पालिकेकडून बुलडोजर चालवण्यात आला. त्यानंतर कंगनाने हा बंगला विकला असल्याची माहिती समोर आली. तसेच तिने हा बंगला स्वस्तात विकल्याचं बोललं जात आहे. कंगनाच्या बंगल्याची जागा सुमारे 3050 स्केअर फूट आणि त्यात सुमारे 500 स्केअर फिटचा पार्किंग आहे. दोन मजले असलेल्या या बंगल्याची किंमत सुमारे 40 कोटी असल्याचं बोललं जात आहे. पण, कंगनाने हा बंगला 32 कोटींना विकला आहे. त्यामुळे तिने नुकसान सोसून या बंगल्याचं डिल केल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे कंगनाला सुमारे आठ कोटींचं नुकसान झाल्याचंही बोललं जात आहे.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)