एक्स्प्लोर

Deepali Sayyed on NEET Protest: 'या सरकारमध्ये प्रभू श्री रामांचे सैनिक आहेत', विद्यार्थी आंदोलनावर दिपाली सय्यद यांची थेट प्रतिक्रिया, VIDEO

Deepali Sayyed on NEET Protest: दिपाली सय्यद यांनी विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर निषेध नोंदवला.

Deepali Sayyed on NEET Protest VIDEO: भारतात सध्या NEET पेपर लीकचा मुद्दा आणि या मुद्द्यावरुन देशभरात सुरु असलेलं आंदोलन चांगलंच तापलं आहे (NEET). 20 जुलै रोजी जंतर - मंतरहून थेट संसद भवनाबाहेर विद्यार्थ्यांसह (Deepali Sayyad) देशातील नागरिकांनी आंदोलन छेडलं. कॉकरोच जनता पार्टीतील समर्थकांसह, लाखोंच्या संख्येने या आंदोलनात लोक उपस्थित होते. या आंदोलनाने उग्र रुप धारण केलं होतं. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला.  काहींची डोकी फुटली तर काहींच्या (Cockroach Janta Party) अंगावरुन रक्त वाहू लागलं होतं.  याच गोष्टीचा निषेध करत अनेक सेलिब्रिटींनी निषेध नोंदवला. बॉलिवूडपासून ते टॉलिवूडपर्यंत, अनेक दिग्गज कलाकारांनी सोशल मीडियावर अधिकृत पोस्ट करत निषेध नोंदवला. अलिकडेच मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी देखील पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी, सरकारी मालमत्तेचं नुकसान करणं हे कोणते आंदोलन? असा सवाल उपस्थित केला आहे. त्यांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे.

दिपाली सय्यद या आंदोलनावर नेमकं काय म्हणाल्या? (Deepali Sayyed reacted to the NEET protest)

अभिनेत्री दिपाली सय्यद 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' या सिनेमामुळे चर्चेत आहे. त्यांनी अलिकडेच देशभरात सुरु असलेल्या आंदोलनावर  भाष्य केलं आहे. त्यांनी व्हिडीओत म्हटलं की, 'नमस्कार जय महाराष्ट्र. मी दिपाली सय्यद. नीट पेपर संदर्भात  ज्या पद्धतीने आपल्या भारताचे भविष्य असलेले विद्यार्थी आंदोलन करतायेत, नक्कीच तो त्यांचा हक्क आहे. आपण ज्या भारत देशात राहतोय, त्या देशात लोकशाही आहे आणि व्यक्तिस्वातंत्र्य सुद्धा आहे. परंतु, व्यक्तिस्वातंत्र्यचा वापर कशापद्धतीने केला पाहिजे, याचा विशेष अधिकार आहे', असं दिपाली आपल्या व्हिडीओत म्हणाल्या.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Yogesh Patil 🚨🇮🇳 (@___yogesh.12)

'सगळ्यात आधी ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर मारहाण झाली. ज्या पद्धतीने पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला आहे. त्या गोष्टीचा मी मनापासून निषेध करतेय. पण आपल्याकडे असलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या अधिकारामुळे आपण आपल्याच सरकारी मालमत्तेचं नुकसान तर करत नाही आहोत ना?  याकडे सुद्धा आपल्या भारताच्या भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांनी लक्ष दिले पाहिजे. कदाचित विरोधक या  आंदोलनाला भडकावण्याचा प्रयत्न तर नाही ना करत?', असा सवाल दिपाली यांनी आपल्या व्हिडीओतून उपस्थित केला. 

'ज्या पद्धतीने बांग्लादेश आणि नेपाळमध्ये आंदोलन भडकलं होतं, तशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न तर होत नाहीये ना? पण हे देखील लक्षात घ्यायला हवे की, हे जे सरकार आहे, ते सर्वसामान्यांचे सरकार आहे.  या सरकारमध्ये प्रभू श्री रामांचे सैनिक आहेत, हे आपण विसरता कामा नये. शेवटी माझं एकच मत आहे. आपल्या भारताची संस्कृती ही वरिष्ठांची आदर करणारी आहे. ही मुलं आपल्या भारताचे भविष्य आहे. कृपया करुन  कुठल्याही भडकावू विधानाला ताकद देऊ नका. मला खात्री आहे, विद्यार्थ्यांच्या मागण्यांना सरकार नक्कीच सपोर्ट करेल.  त्यांना नक्कीच पाठबळ मिळेल. जय महाराष्ट्र...', असंही दिपाली सय्यद म्हणाल्या.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'धुरंधर'चा रेकॉर्ड मोडला, 'छावा' सिनेमालाही पछाडलं, थलपती विजयच्या 'जना नायकन'नं ओपनिंग डेला किती कोटी कमावले?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Awarapan 3: 'आशा आहे की 'आवारापन'चा तिसरा पार्ट...'; इम्रान हाश्मीचा प्रेक्षकांना सरप्राइज, सिनेमाचा तिसरा पार्ट येणार?
'आशा आहे की 'आवारापन'चा तिसरा पार्ट...'; इम्रान हाश्मीचा प्रेक्षकांना सरप्राइज, सिनेमाचा तिसरा पार्ट येणार?
Rani Mukharjee Award: राणी मुखर्जींचा परदेशात डंका! ऑस्ट्रेलियात मिळाला मोठा सन्मान; पुरस्कार स्वीकारताना अभिनेत्री भावुक
राणी मुखर्जींचा परदेशात डंका! ऑस्ट्रेलियात मिळाला मोठा सन्मान; पुरस्कार स्वीकारताना अभिनेत्री भावुक
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Embed widget