एक्स्प्लोर

Dagdi Chawl 2 : डेझी शहाची मराठी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; 'दगडी चाळ 2' मधील ' राघू पिंजऱ्यात आला' गाणं प्रेक्षकांच्या भेटीस

'दगडी चाळ 2' (Dagdi Chawl 2) या चित्रपटात मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Dagdi Chawl 2 : 'दगडी चाळ 2' (Dagdi Chawl 2) हा चित्रपट येणार असल्याचे समजल्यापासूनच यातील प्रमुख व्यक्तिरेखा कोण साकारणार, याची सर्वच प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती आणि नुकतेच यातील प्रमुख चेहरे आपल्या समोर आले. आता या चित्रपटातील पहिले आणि जबरदस्त गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे.

'राघू पिंजऱ्यात आला' असे या गाण्याचे बोल असून "डेझी शाह " या बॅालिवूडमधील नामांकित चेहऱ्याने या गाण्याच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. अमितराज यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला मुग्धा कऱ्हाडे हीचा आवाज लाभला आहे. तर अवघ्या बॉलीवूडला आपल्या तालावर नाचवणाऱ्या आदिल शेख यांनी या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. गाण्याचे भन्नाट बोल, डेझीचा सीझलिंग परफॉर्मन्स आणि घायाळ करणाऱ्या तिच्या अदा या सगळ्यामुळे हे गाणे ग्लॅमरस बनले आहे. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ 2' येत्या 18 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 

या गाण्याबद्दल निर्मात्या संगीता अहिर म्हणतात,  "जेव्हा या गाण्याचा आम्ही या चित्रपटात समावेश करण्याचे ठरवले, तेव्हा सर्वात आधी माझ्यासमोर डेझी शाहचा चेहरा आला. याबाबत आम्ही तिला विचारणा केली आणि तिनेही त्वरित होकार दिला. हिंदी चित्रपटातील अभिनेत्रीने मराठी पडद्यावर काम करायला इतक्या लगेच होकार देणे, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. गाण्याची टीमच इतकी अफलातून आहे की, हे गाणे, डेझीचे नृत्य प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. प्रत्येकाला थिरकायला लावणारे हे गाणे आहे.'' 

पाहा गाणं:

संगीतकार अमितराज या गाण्याबद्दल म्हणतात, "क्षितिज पटवर्धन यांनी गाण्याचे बोल इतके उत्स्फूर्त लिहिले की, त्याला संगीतही त्याच ताकदीचे लागणार होते. मुग्धानेही या गाण्याला उत्तम न्याय दिला आहे आणि मात्र त्यात अधिक रंगत आणली आहे ती डेझीच्या बहारदार नृत्याने.  हे गाणे ऐकताना कोणाचेच पाय जमिनीवर स्थिर राहू शकत नाहीत. सगळ्यांना ठेका धरायला लावणारे हे गाणे आहे." 

या चित्रपटात मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा:

Daagdi Chawl 2 : 'दगडी चाळ 2' मध्ये पुन्हा झळकणार 'कलरफुल' पूजा सावंत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सीमाप्रश्नासाठी महाराष्ट्र आणि तेथील जनता आपल्या सोबत आहे की नाही अशी शंका; महाराष्ट्र एकीकरण समितीची खंत
सीमाप्रश्नासाठी महाराष्ट्र आणि तेथील जनता आपल्या सोबत आहे की नाही अशी शंका; महाराष्ट्र एकीकरण समितीची खंत
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे आणि सीएम एकनाथ शिंदे कोल्हापुरात एकाच दिवशी करणार प्रचाराचा शुभारंभ!
उद्धव ठाकरे आणि सीएम एकनाथ शिंदे कोल्हापुरात एकाच दिवशी करणार प्रचाराचा शुभारंभ!
शिंदे गटाने नाशिकच्या उमेदवारांना चार्टर्ड प्लेनने एबी फॉर्म पाठवले, निवडणूक आयोगाची वक्रदृष्टी वळाली, चौकशीचे आदेश
शिंदे गटाने नाशिकच्या उमेदवारांना चार्टर्ड प्लेनने एबी फॉर्म पाठवले, निवडणूक आयोगाची वक्रदृष्टी वळाली, चौकशीचे आदेश
Sanjay Raut: भाजपवाले सोनिया गांधींनाही इम्पोर्टेड माल, विधवा बोलायचे, शायना एनसी प्रकरणात संजय राऊतांचा पलटवार
भाजपवाले सोनिया गांधींनाही इम्पोर्टेड माल, विधवा बोलायचे, संजय राऊतांचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule on Sharad Pawar Padwa : पवारांच्या घरात दोन पाडवा; सुप्रियाताईंची संतप्त प्रतिक्रियाBaramati Diwali Padwa : गोविंद बाग, काटेवाडी शरद पवार-अजित पवारांचा पाडवा वेगवेगळाABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 02 November 2024Ravi Rana Navneet Rana Padwa: रवी राणा, नवनीत राणांचं औक्षण, आमदारकीचं मागितलं गिफ्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सीमाप्रश्नासाठी महाराष्ट्र आणि तेथील जनता आपल्या सोबत आहे की नाही अशी शंका; महाराष्ट्र एकीकरण समितीची खंत
सीमाप्रश्नासाठी महाराष्ट्र आणि तेथील जनता आपल्या सोबत आहे की नाही अशी शंका; महाराष्ट्र एकीकरण समितीची खंत
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे आणि सीएम एकनाथ शिंदे कोल्हापुरात एकाच दिवशी करणार प्रचाराचा शुभारंभ!
उद्धव ठाकरे आणि सीएम एकनाथ शिंदे कोल्हापुरात एकाच दिवशी करणार प्रचाराचा शुभारंभ!
शिंदे गटाने नाशिकच्या उमेदवारांना चार्टर्ड प्लेनने एबी फॉर्म पाठवले, निवडणूक आयोगाची वक्रदृष्टी वळाली, चौकशीचे आदेश
शिंदे गटाने नाशिकच्या उमेदवारांना चार्टर्ड प्लेनने एबी फॉर्म पाठवले, निवडणूक आयोगाची वक्रदृष्टी वळाली, चौकशीचे आदेश
Sanjay Raut: भाजपवाले सोनिया गांधींनाही इम्पोर्टेड माल, विधवा बोलायचे, शायना एनसी प्रकरणात संजय राऊतांचा पलटवार
भाजपवाले सोनिया गांधींनाही इम्पोर्टेड माल, विधवा बोलायचे, संजय राऊतांचा पलटवार
Ajit Pawar Gold Mithai : लाडक्या दादांसाठी सोन्याची मिठाई,  कार्यकर्त्याकडून पाडवा भेट
Ajit Pawar Gold Mithai : लाडक्या दादांसाठी सोन्याची मिठाई, कार्यकर्त्याकडून पाडवा भेट
PM Modi Vs Kharge: पंतप्रधान मोदींनी 'त्या' वक्तव्यावर बोट ठेवत काँग्रेसवर टीकेची राळ उठवली, मल्लिकार्जुन खरगेंचाही पलटवार
पंतप्रधान मोदी आणि खरगेंमध्ये जोरदार ट्विटर वॉर, एकमेकांवर तुटून पडत जुना हिशेब काढला
53 किलो चांदी, सोन्याची बिस्किटं, हिरे-मोत्यांचे दागिने जप्त, विधानसभेच्या धामधुमीत अहिल्यानगरमध्ये घबाड सापडलं
53 किलो चांदी, सोन्याची बिस्किटं, हिरे-मोत्यांचे दागिने जप्त, विधानसभेच्या धामधुमीत अहिल्यानगरमध्ये घबाड सापडलं
Maharashtra Assembly Election 2024 : अब्दुल सत्तारांना निवडणूक आयोगाचा झटका! 24 तासांचा वेळ; अडचणी वाढल्या, काय आहे प्रकरण?
अब्दुल सत्तारांना निवडणूक आयोगाचा झटका! 24 तासांचा वेळ; अडचणी वाढल्या, काय आहे प्रकरण?
Embed widget