एक्स्प्लोर

Corona Relief Fund : प्रियांका चोप्राच्या गिव्ह इंडिया कॅम्पेनने जमवला जवळपास पाच कोटींचा निधी!

भारतात कोरोनामुळे ओढवलेल्या संकटात आर्थिक मदत करण्यासाठी भारतीय अभिनेत्री आणि पॉपस्टार प्रियांका चोप्रा हिने गिव्ह इंडिया नावातं कॅम्पेन सुरू केलं आहे. तीन दिवसात या कॅम्पेनसाठी जवळपास पाच कोटी रुपये जमल्याची माहिती मिळाली आहे.


मुंबई: गेल्या काही दिवसांपासून भारतातला कोरोनाचा टक्का वाढू लागला आहे. त्याची दखल जगातल्या अनेक मुख्य देशांनी घेतलीय. ऑस्ट्रेलियाने आपली भारतावरून येणारी उड्डाणं रद्द केली, तर अमेरिकेच्या नेत्यांनी भारतात लॉकडाऊन असायला हवा असा सल्ला दिला. अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कलाकारांनी सोशल मीडियावर भारतात उद्भवलेल्या स्थितीबद्दल हळहळ व्यक्त केली. भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्राही यात मागे नव्हती. तिनेही सोशल मीडियाद्वारे भारतात कोरोना वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. 

प्रियांकाने केवळ चिंता व्यक्त न करता आपल्या देशासाठी काहीतरी करायचं ठरवलं. यातूनच तिने 'गिव्ह इंडिया' या कॅम्पेनला सुरुवात केली. भारतातली स्थिती व्हिडीओद्वारे दाखवतानाच आता भारताला मदतीची गरज असल्याचं सांगितलं. इन्स्टाग्राम, ट्विटर या आपल्या सोशल मिडीयावरून तिने हे व्हिडिओ पोस्ट करत 'गिव्ह इंडिया'ची माहिती दिली होती. तिच्यासोबत तिचा नवरा पॉपस्टार निक जोनस यानेही भारताला मदत करण्याचं आवाहन केलं होतं. वैद्यकीय सुविधा, औषधं आदींसाठी हा निधी वापरला जाणार असल्याचं सांगितलं गेलं. आता काही दिवसांतच प्रियांकाच्या या आवाहनाला जगभरातून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. 

काही परदेशी वेबसाईट्सनी दिलेल्या वृत्तानुसार प्रियांकाच्या या आवाहनाला प्रतिसाद म्हणून जवळपास पाच कोटींचा निधी जमला आहे. एकूण किती निधी जमला याची अधिकृत घोषणा प्रियांकाने अद्याप केलेली नाही. पण गेल्या तीन दिवसांत या गिव्ह इंडिया कॅम्पेनला पाच कोटींची मदत झाल्याचं कळतं. गिव्ह इंडिया या कॅम्पेनमधून भारताला मदत करायचं आवाहन प्रियांका आणि निकने अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनाही केलं आहे. 

प्रियांकाचा सोनूला पाठिंबा

भारतातली स्थिती पाहता प्रियांका आणि निक सातत्याने आपल्या सोशल मिडीयावरून लोकांना मदतीचं आवाहन करत आहेत. आता भारतात काही कलाकार कोरोनाविरोधात लढत असताना दिसतायत. त्यांना प्रियांका पाठिंबा देऊ लागली आहे. अभिनेता सोनू सूदने मुलांसाठी काम करायचं ठरवलं आहे. कोरोनामुळे ज्या मुलांचे पालक हयात नाहीत अशा मुलांचा शैक्षणिक खर्च सरकारने करावा असं सोनूनं काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. शिवाय त्याची एनजीओ अशा मुलांसाठी काम करणार आहे. तर प्रियांकाने सोनूच्या या कल्पनेला पाठिंबा देत त्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर टाकून शेअर केला आहे.

प्रियांकाने यापूर्वीही भारतात घडत असलेल्या गोष्टींवर कायमच आपलं मत मांडलंय, युनिसेफसोबत तिने बरीच वर्ष काम केलंय आणि त्या संस्थेमार्फत अनेक देशांना मदतही केलीय. प्रियांका आणि निकच्या या आवाहनाला शॉन मेंडेस, कमिला कॅबेलोसारखे मोठे गायकही चांगला प्रतिसाद देत आहेत. लवकरच याबद्दलची अधिकृत घोषणा प्रियांका करणार असल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या

TMKOC Tanuj Mahashabde Iyer Bhai: 'आईसारखं कुणी नाही...'; 'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम अय्यर भाई आईंच्या आठवणीत भावूक, पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाले...
'आईसारखं कुणी नाही...'; 'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम अय्यर भाई आईंच्या आठवणीत भावूक, पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाले...
'मी लांबून बघितलेले प्रवीण तरडे आणि...', प्रवीण तरडेंबाबर धनंजय पोवारची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
'मी लांबून बघितलेले प्रवीण तरडे आणि...', प्रवीण तरडेंबाबर धनंजय पोवारची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
Nivedita Ashok Saraf: 'श्री स्वामी समर्थ आपल्या आईसारखे..'; निवेदिता सराफ स्वामींबद्दल बोलताना झाल्या भावूक, गुरुंबद्दल म्हणाल्या...
'श्री स्वामी समर्थ आपल्या आईसारखे..'; निवेदिता सराफ स्वामींबद्दल बोलताना झाल्या भावूक, गुरुंबद्दल म्हणाल्या...
'पुरुषांची मक्तेदारी असलेल्या इंडस्ट्रीत...'; प्राजक्ता माळीची क्रांती रेडकरसाठी पोस्ट, आढेवेढे न घेता थेटच म्हणाली...
'पुरुषांची मक्तेदारी असलेल्या इंडस्ट्रीत...'; प्राजक्ता माळीची क्रांती रेडकरसाठी पोस्ट, आढेवेढे न घेता थेटच म्हणाली...

व्हिडीओ

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Police: बदली न झाल्याने पोलीस कॉन्स्टेबलचा संताप; थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या शासकीय निवासस्थानी कार घुसवायचा प्रयत्न, बंगल्याच्या मेन गेटला कारनं ठोकलं
बदली न झाल्याने पोलीस कॉन्स्टेबलचा संताप; थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या शासकीय निवासस्थानी कार घुसवायचा प्रयत्न, बंगल्याच्या मेन गेटला कारनं ठोकलं
US Midterm Elections Result 2026 Live Updates: अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धडाधड धक्के; जॉर्जिया आणि व्हर्जिनियामध्ये डेमोक्रॅट्सचा विजय, निवडणुकांचे निकाल Live
अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धडाधड धक्के; जॉर्जिया आणि व्हर्जिनियामध्ये डेमोक्रॅट्सचा विजय, निवडणुकांचे निकाल Live
US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; ट्रम्प यांचा पक्ष हरला तर भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; ट्रम्प यांचा पक्ष हरला तर भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
Gokul Election: गोकुळवरून कोल्हापुरात लेटर वॉर; सतेज पाटलांच्या पत्राला महायुतीचं धडाकेबाज प्रत्युत्तर, म्हणाले
गोकुळवरून कोल्हापुरात लेटर वॉर; सतेज पाटलांच्या पत्राला महायुतीचं धडाकेबाज प्रत्युत्तर, म्हणाले "तुमचे दोन संचालक आम्हाला द्या अन्..."
Raju Shetty Agitation: तुम्ही आमची दिवाळी होऊ दिली नाही, आम्ही तुमची दिवाळी होऊ देणार नाही, राजू शेट्टींनी पुणे-बंगळुरु महामार्ग रोखून धरला, 22 तासांपासून वाहतूक ठप्प
तुम्ही आमची दिवाळी होऊ दिली नाही, आम्ही तुमची दिवाळी होऊ देणार नाही, राजू शेट्टींनी पुणे-बंगळुरु महामार्ग रोखून धरला, 22 तासांपासून वाहतूक ठप्प
Dia Mirza Diwali Video: हायकोर्टाच्या तंबीनंतरही BMC ढिम्म बसून राहिली, दिया मिर्झाचा व्हिडीओ पुन्हा अपलोड केलाच नाही, आता स्थायी समितीत राजकारण तापणार?
हायकोर्टाच्या तंबीनंतरही BMC ढिम्म बसून राहिली, दिया मिर्झाचा व्हिडीओ पुन्हा अपलोड केलाच नाही, आता स्थायी समितीत राजकारण तापणार?
NCP Internal unrest: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी, देवगिरी बंगल्यावरच्या रात्रीच्या बैठकीनंतर पुन्हा कोअर कमिटी जमणार, नेमकं काय सुरु?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी, देवगिरी बंगल्यावरच्या रात्रीच्या बैठकीनंतर पुन्हा कोअर कमिटी जमणार, नेमकं काय सुरु?
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
Embed widget