Oppenheimer : अणुबाँबचा जनक 'ओपनहायमर' बघाच... पण त्या आधी ख्रिस्तोफर नोलनचे हे दहा भन्नाट हॉलिवूडपट पाहिलेत का?
Christopher Nolan Movies : हॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन हा त्याच्या भव्य दिव्य संकल्पना आणि चित्रपटासाठी ओळखला जातोय. आता त्याचा ओपनहायमर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Christopher Nolan Top 10 Hollywood Movies : टेनेट, डंकिर्क, इन्सेप्शन, द डार्क नाईट या सारख्या भव्यदिव्य कल्पनांचे निर्माते ख्रिस्तोफर नोलन (Christopher Nolan) आता अणुबॉम्बचा (Oppenheimer) जनक पडद्यावर आणणार आहे. ओपनहायर हा त्याचा चित्रपट 21 जुलै रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. ख्रिस्तोफर नोलनने या आधी टाईम ट्रॅव्हलवर आधारित चित्रपटांची निर्मिती केली आहे, ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्याचे प्रत्येक चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असते. ख्रिस्तोफर नोलनचे प्रत्येकाने पाहिलेच पाहिजे असे दहा हॉलिवूडपट आम्ही देत आहोत.
1. टेनेट (2020) (Tenet)
टेनेट (Tenet) हा 2020 सालचा सायन्स-फिक्शन अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. ख्रिस्तोफर नोलनने या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात जॉन डेव्हिड वॉशिंग्टन, रॉबर्ट पॅटिन्सन, एलिझाबेथ डेबिकी, डिंपल कपाडिया, मायकेल केन आणि केनेथ ब्रानाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
टेनेट या चित्रपटाच्या कथेतील संकल्पनेवर काम करताना, त्याचे लिखान करण्यासाठी ख्रिस्तोफर नोलनने पाच वर्षाहून अधिक कालावधी घेतला आणि त्यानंतर या भव्यदिव्य चित्रपटाची निर्मिती झाली आहे. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
2. द डार्क नाइट राइजेस (2012) (The Dark Knight Rises)
द डार्क नाइट राइजेस हा क्रिस्टोफर नोलन दिग्दर्शित 2012 चा बॅटमॅन या सुपरहिरोवर चित्रपट आहे. बॅटमॅन बिगिन्स (2005) आणि द डार्क नाइट (2008) या मालिकेतील तो तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटातील थिम आणि कथा ही अत्युच्च दर्जाची आहे.
3. इंटरस्टेलर (2014) (Interstellar)
इंटरस्टेलर हा क्रिस्टोफर नोलन सह-लिखित, सह-निर्मित आणि दिग्दर्शित 2014 चा सायन्स फिक्शन अॅक्शन चित्रपट आहे. या चित्रपटात मॅथ्यू मॅककोनाघी, अॅन हॅथवे, जेसिका चेस्टेन, बिल एर्विन, एलेन बर्स्टीन आणि मायकेल केन यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाच्या कथेनुसार, अंतराळवीरांचा एक गट सर्व मानवाजातीसाठी एका नव्या वास्तवााच्या शोधात अंतराळ प्रवासाला जातात आणि नंतर जे काही घडतं ते भयंकर आहे.
4. इन्सेप्शन (Inception)
इनसेप्शन हा 2010 चा अमेरिकन सायन्स-फिक्शन अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक क्रिस्टोफर नोलन आहे. या चित्रपटात लिओनार्डो डिकॅप्रियो, एलेन पेज, जोसेफ गॉर्डन-लेविट, मॅरियन कोटिलार्ड, केन वातानाबे, टॉम हार्डी, दिलीप राव, सिलियन मर्फी, टॉम बेरेंजर आणि मायकेल केन यांनी भूमिका केल्या आहेत. या चित्रपटातील नायक हा एक व्यावसायिक चोर असून तो इतरांच्या मनात, स्वप्नांच्या माध्यमातून प्रवेश करत असतो. नोलनची या चित्रपटातील कल्पनाच एकदम भन्नाट आहे.
5. बॅटमॅन बिगिन्स (2005) (Batman Begins)
बॅटमॅन बिगिन्स हा 2005 चा महाचित्रपट बॅटमॅन या सुपरहिरोवर आधारित आहे. हा चित्रपट बॅटमॅन या काल्पनिक डीसी कॉमिक्स पात्रावर आधारित आहे,. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि सह-लेखन ख्रिस्तोफर नोलनने केले आहे.
6. इन्सोमॅनिया (Insomnia)
इन्सोमॅनिया हा ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित हॉलिवूड सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट 1997 मध्ये याच नावाच्या नॉर्वेजियन चित्रपटाचा रिमेक आहे. लॉस एंजेलिस हत्याकांड दोन गुप्तहेरांनी हत्येचे गूढ कसे सोडवले हा कथेची मुख्य संकल्पना आहे.
7. द डार्क नाइट (2008) (The Dark Knight)
द डार्क नाइट हा 2008 सालचा चित्रपट हा बॅटमॅन या सुपरहिरोवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन, निर्मिती क्रिस्टोफर नोलन यांनी केले आहे. डीसी कॉमिक्स कॅरेक्टर बॅटमॅनवर आधारित, हा नोलनच्या बॅटमॅन चित्रपट मालिकेचा दुसरा भाग आहे आणि 2005 च्या बॅटमॅन बिगिन्सचा सिक्वेल आहे. यामध्ये ख्रिश्चन बेल, मायकेल केन, हीथ लेजर, गॅरी ओल्डमन, आरोन एकहार्ट, मॅगी गिलेनहाल आणि मॉर्गन यांनी भूमिका केल्या आहेत. बॅटमॅन (बेल), लेफ्टनंट जेम्स गॉर्डन (ओल्डमॅन) आणि नवनिर्वाचित जिल्हा वकील हार्वे डेंट (एक्हार्ट) यांनी शहरातील माफियांच्या संघटित गुन्हेगारीचा नाश करण्यासाठी सर्व जोखीम पत्करली आणि ती निभावली.
8. डंकर्क (2017) (Dunkirk)
डंकर्क हा 2017 चा क्रिस्टोफर नोलन लिखित, दिग्दर्शित आणि सह-निर्मित ऐतिहासिक विषयावर आधारित चित्रपट आहे . दुसऱ्या महायुद्धादरम्यान डंकर्क या ठिकाणी घडलेल्या घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. नोलनच्या बेस्ट चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट वरच्या क्रमांकावर येतो.
9. मोमेंटो (Memento)
मेमेंटो हा 2001 मध्ये प्रकाशित झालेला मिस्ट्री सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन ख्रिस्तोफर नोलन याने केलं आहे. हा चित्रपट लिओनार्ड शेल्बी नावाच्या माणसावर आधारित आहे ज्याला अँटेरोग्रेड स्मृतीभ्रंशाचा आजार आहे. त्यामुळे स्मरणशक्ती कमी होते आणि नवीन आठवणी लक्षात राहत नाहीत.
10. द प्रेस्टिज (The Prestige)
द प्रेस्टिज हा क्रिस्टोफर नोलन दिग्दर्शित 2006 चा सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. नोलन आणि त्याचा भाऊ जोनाथन यांनी या चित्रपटाचे लेखन केलं आहे. ख्रिस्तोफर प्रिस्टच्या 1995 सालच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. यात रॉबर्ट अँजियरच्या भूमिकेत ह्यू जॅकमन आणि अल्फ्रेड बोर्डेनच्या भूमिकेत ख्रिश्चन बेल आहेत, व्हिक्टोरियन लंडनमधील जादूगारांवर आधारित हा चित्रपट आहे.
निकोला टेस्लाच्या भूमिकेत स्कारलेट जोहानसन आहे तर मायकेल केन, पाइपर पेराबो, अँडी सर्किस, रेबेका हॉल आणि डेव्हिड बोवी यांनी या चित्रपटात भूमिका साकारली आहे.
ही बातमी वाचा: