Shivaji Maharaj : सह्याद्री वाहिनीवर उद्या होणार 'फत्तेशिकस्त' चित्रपटाचे प्रसारण; शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त उपक्रम
Shivaji Maharaj : शिवराज्यभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सह्याद्री वाहिनीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायक चित्रपट पाहण्याची पर्वणी रसिकांना उपलब्ध होणार आहे.
Shivaji Maharaj : महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या राज्यभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सह्याद्री वाहिनीवर ( DD Sahyadri) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायक चित्रपट पाहण्याची पर्वणी रसिकांना उपलब्ध होणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक दिगपाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित `फत्तेशिकस्त' चित्रपटाने शनिवार, (24 फेब्रुवारी) दुपारी दीड वाजता चित्रपटाचे प्रसारण होणार आहे. 'फत्तेशिकस्त' हा सिनेमा राज्यातील रसिकांनी आवर्जून पाहावा असे आवाहन महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे 350 व्या वर्षानिमित्ताने उत्साहात ठिकठिकाणी कार्यक्रम सुरू आहेत. या कार्यक्रमांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आणि प्रेरणा नव्या पिढीला मिळत असे महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळाने सांगण्यात आले आहे.
शिवरायांची प्रेरणा रसिकप्रेक्षकांना मिळावी, यासाठी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुंनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित निवडक प्रेरणादायक चित्रपट दाखविण्याचा स्तुत्य उपक्रम महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत राबविण्यात येत आहे.
'शिवरायांचा छावा' गाजवतोय बॉक्स ऑफिस
मागील आठवड्यात दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित 'शिवरायांचा छावा' (Shivrayancha Chhava) चित्रपट प्रदर्शित झाला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. रिलीजच्या चार दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 5.12 कोटींची कमाई केली. त्यानंतर आलेल्या शिवजयंतीलादेखील प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला.
View this post on Instagram
छत्रपती संभाजी महाराज म्हणजे एक अद्वितीय व्यक्तिमत्व. धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणाऱ्या या महान योद्धयाची संपूर्ण कारकीर्द तेजोमय होती. आलेल्या संकटांवर पाय रोऊन उभे राहत छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अल्पकाळात मराठा साम्राज्याचा विस्तार केला. छत्रपती संभाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्य, हुशारी आणि धाडस या गुणांचे दर्शन ‘शिवरायांचा छावा’ या सिनेमात घडत आहे.