एक्स्प्लोर

Chhaava Actor Vineet Kumar Singh: डॉक्टरकी सोडून बनला अॅक्टर, दोन दशकांपासून अतोनात संघर्ष; डॉक्टरकी सोडून बनला अ‍ॅक्टर, दोन दशकांपासून अतोनात संघर्ष; 'छावा'तला कवि कलश खऱ्या आयुष्यात कोण?

Chhaava Actor Vineet Kumar Singh: 'छवा' मध्ये कवि कलशची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याचं खूप कौतुक होत आहे. हा अभिनेता विक्की कौशलच्या जवळच्या मित्राच्या भूमिकेत अगदी उठून दिसलाय. डॉक्टरकी सोडून इंडस्ट्रीत नशीब आजमावणारा 'हा' अभिनेता नेमका कोण?

Chhaava Actor Vineet Kumar Singh: सध्या 'छावा' (Chhaava) बॉक्स ऑफिससह (Box Office) थिएटरमध्येही धुमाकूळ घालत आहे. 'छावा'मध्ये बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) भूमिकेत झळकला आहे. तर, अक्षय खन्ना (Akshaye Khanna) मुघल बादशाह (Mughal Empire) औरंगजेबाच्या (Aurangzeb) भूमिकेत दिसला आहे. तर, चित्रपटात महाराणी येसूबाईंची (Maharani Yesubai) भूमिका रश्मिका मंदानानं (Rashmika Mandanna) साकारली आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकलेल्या सेलिब्रिटींसोबतच 'छावा'मधल्या इतर कलाकारांवरही कौतुकाचा वर्षाव होत आहे. असंच एक खास पात्र म्हणजे, कवि कलश. 

'छावा'मध्ये छत्रपती संभाजी राजेंच्या अत्यंत जवळच्या एका व्यक्तीचं पात्र दाखवण्यात आलं आहे. त्याचं नाव कवि कलश. हे पात्र मुघलांचा दरबार गाजवल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांपर्यंत येऊन पोहोचतं आणि पाहता पाहता त्यांचा अगदी जवळच्या व्यक्तींमध्ये सहभागी होतं. कवि कलश छत्रपती संभाजी महाराजांसाठी काहीही करायला तयार असतं. पण, त्याच्याकडे अनेकजण कायम संशयी नजरेनंच पाहतात. पण, अखेर कवि कलशच महाराजांना शेवटपर्यंत साथ देतो, असं चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. सध्या विक्की, रश्मिका, अक्षय खन्ना यांच्यासोबतच हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्यावरही कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

कवि कलश हे पात्र एका अनुभवी अभिनेत्यानं साकारलं आहे. त्यानं अगदी बारकावे लक्षात घेत हे पात्र साकारलं आहे. गेल्या 20 वर्षांपासून, हा अभिनेता बॉलिवूडमध्ये स्वतःचं नाव कमावण्याचा प्रयत्न करत आहे. पण, अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आलं आणि 'छावा'च्या रुपात त्याला स्वतःला सिद्ध करण्याचा योग आला. 

वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर आणि डॉक्टर झाल्यानंतर, या पठ्ठ्यानं वेगळा मार्ग निवडला. आणि डॉक्टरकी सोडून थेट इंडस्ट्रीत नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. यशस्वी वैद्यकीय कारकीर्द सोडून, ​​अभिनेता बनण्याच्या त्याच्या भूकेनं त्याला एक संघर्षशील बनवलं. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयानं खोलवर छाप सोडली, पण तरीही त्याला वेगळी ओळख हवी होती. अखेर 'छावा'मध्ये त्यानं आपल्या अभिनयानं सर्वांना भूरळ घातली. या अभिनेत्याचं नाव आहे, विनीत कुमार. 

यापूर्वी केल्यात अनेक भूमिका... 

'मुक्काबाज' आणि 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेता विनीत कुमार सिंहनं फिल्म 'छावा'मध्ये कवि कलशच्या भूमिकेला आपल्या अभिनयानं फुलवलं. 'छावा'मध्ये या अभिनेत्यानं कवि कलश ही भूमिका साकारली आहे. जे एक कवि आणि योद्धा दोन्ही आहेत. या भूमिकेत त्यांनी छत्रपति संभाजी महाराजांच्या मित्राची भूमिका साकारली आहे. कवि कलश उत्तर भारतीय आहे. पण, मराठा साम्राज्य आणि आपला मित्र छत्रपति संभाजी महाराजांप्रति निष्ठावान आहे. 

चित्रपटातील भूमिका नेमकी कशी? 

कवि कलश उत्तर भारतातील असूनही, तो छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात विश्वासू सहकारी म्हणून उभा राहतो. त्यांची अनोखी शैली आणि छत्रपती संभाजी महाराजांशी असलेली त्यांची जवळीक मराठा साम्राज्यातील सर्वांनाच फारशी रुचत नव्हती. असं असूनही, जेव्हा वेळ आली, तेव्हा तो मराठा साम्राज्याचा सन्मान, प्रतिष्ठा आणि वैभव राखण्यात आघाडीवर होते आणि छत्रपती संभाजी महाराजांसोबत खांद्याला खांदा लावून पूर्ण निष्ठेनं लढले. जर त्यांना हवं असतं तर ते स्वतःला वाचवू शकले असते, पण त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत मराठा साम्राज्य, हिंदवी स्वराज्य आणि त्यांचे मित्र छत्रपती संभाजी महाराज यांना सोडलं नाही. विनीत कुमारनं ही व्यक्तिरेखा रुपेरी पडद्यावर जिवंत केली आहे.  

कवितांमध्ये आपल्या शैलीनं प्राण फुंकला... 

फिल्ममध्ये विनीत कुमार सिंहचा अभिनय खूप प्रभावी आहे. जेव्हा तो कविता वाचतो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर सौम्यता आणि हास्य दिसून येतं, पण शौर्यपूर्ण कविता करताना त्याच्या आवाजात गर्जना असते आणि त्याच्या चेहऱ्यावर एक प्रचंड संताप दिसून येतो. विनीतनं कवी कलशच्या व्यक्तिरेखेत पूर्णपणे जीवंतपणा आणला आहे आणि ही भूमिका त्याच्या कारकिर्दीतील एक संस्मरणीय भूमिका बनू शकते. 

पाहा व्हिडीओ : विक्की कौशल, रश्मिका मंदानाचा Exclusive Interview

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Chhaava Actress Rashmika Mandana Instagram Post: 'छावा'ला तुफान प्रतिसाद, महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत झळकलेली रश्मिका म्हणते; "माझ्या मनात कधीच असं नव्हतं..."

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Omkar Tarmale : बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Omkar Tarmale : बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Manikrao Kokate Resignation: अटक वॉरंट निघण्याची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
अटक वॉरंटची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Embed widget