एक्स्प्लोर

Chhaava Actress Rashmika Mandana Instagram Post: 'छावा'ला तुफान प्रतिसाद, महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत झळकलेली रश्मिका म्हणते; "माझ्या मनात कधीच असं नव्हतं..."

Chhaava Actress Rashmika Mandana Instagram Post: लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करतोय. या चित्रपटातील रश्मिकाच्या भूमिकेचंही कौतुक होत आहे.

Chhaava Actress Rashmika Mandana Instagram Post: छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) आयुष्यावर आधारित असलेला 'छावा' (Chhaava Movie) सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. फक्त दोनच दिवसांतच 'छावा'नं आपल्या भांडवलाच्या 55 टक्के रक्कम कमावली आहे. अशातच 'छावा'मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विक्की कौशल आणि महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) झळकली आहे. दोघांच्याही अभिनयाचं सर्वच स्तरांतून जोरदार कौतुक केलं जात आहे. अशातच चित्रपटाला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर रश्मिका मंदानानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. 

'छावा'ला सध्या तुफान प्रतिसाद मिळत आहे. अशातच 'छावा'मध्ये महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत झळकलेल्या रश्मिका मंदानानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. रश्मिकानं पोस्ट करत दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचे आभार मानले आहेत. तसेच, महाराणी येसूबाई रुपेरी पडद्यावर साकारणं हा अनुभव तिच्यासाठी कसा होता, हे देखील सांगितलं आहे. 

सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये रश्मिका नेमकं काय म्हणाली?

महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत झळकलेली दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना म्हणाली की, "मी वक्त्यापेक्षा चांगलं लिहू शकते, म्हणून हे... मी मिमी हा चित्रपट पाहिला होता आणि मला तो चित्रपट इतका आवडला की मला लक्ष्मण सरांना माझ्या 'गुडबाय' चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी आमंत्रित करायचं होतं आणि म्हणून मी त्यांना मेसेज केला आणि तेव्हाच प्रवास सुरू झाला. सरांनी लगेच मला विचारलं की, ते मला फोन करू शकतात का? आणि आम्ही बोललो, ते मला सांगत होते की, त्यांना त्यांच्या पुढच्या चित्रपटासाठी मला भेटायचंय... आणि मला वाटलं की, ती फक्त चांगलं बोलत आहे, पण प्रत्यक्षात भेट झाली आणि त्यामुळे मला खूप आनंद झाला की ते घडलं... मी याबद्दल विश्वाचे खरोखर आभार मानते..."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

रश्मिकानं पुढे लिहिलं आहे की, "मला कथा माहीत नव्हती. ते माझ्याकडे का आले, हे मला माहीत नव्हतं, त्यांनी मला महाराणी म्हणून कसं पाहिलं हे मला माहीत नव्हतं. मला काय घडतंय, हे देखील माहीत नव्हतं... जेव्हा मी प्रत्यक्षात स्क्रिप्ट ऐकली, तेव्हा मी गोंधळले, धक्का बसला... पण खूप कृतज्ञ वाटत होतं, भारावून गेलेले आणि इतका आनंदी झाला की, मला काय बोलावं हेच कळत नव्हतं. कारण मला माहीत नव्हतं की, आपण हे कसं साध्य करणार आहोत."

"महाराणी येसूबाईची भूमिका साकारणारी दक्षिणेकडची एक मुलगी... माझ्या मनात कधीच असं नव्हतं... मला कधीच वाटलं नव्हतं की, ते शक्य आहे, आणि म्हणूनच मला अशा लोकांसोबत काम करायला आवडतं जे आपल्याला सीमांच्या पलीकडे स्वप्न पाहण्याची आशा देतात...", असं रश्मिका म्हणाली आहे. 

"आणि मग महाराणी रुपेरी पडद्यावर अतरली. ती शक्तिशाली आहे... ती सुंदर आहे... ती एक खरी राणी आहे... तिचं प्रेम हेच प्रेम आहे, ज्याच्याशी मी खरोखरच जोडले गेले. ते इतकं शुद्ध आहे की, ते दैवी आहे आणि इतकं आदरणीय आहे, इतकं खरं आहे की, महाराज आणि महाराणी नेहमीच शब्दांच्या पलीकडे जोडलेले असतात.", असं म्हणाली. 

पाहा व्हिडीओ : विक्की कौशल, रश्मिका मंदानाचा Exclusive Interview

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Chhaava Box Office Collection Day 2: आया आया आया रे तुफान... 'छावा'नं बॉक्स ऑफिस हादरवलं, दुसऱ्याच दिवशी बजेटच्या 55 टक्क्यांची कमाई

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

जमलं ! लोकप्रिय अभिनेत्रीची मालिकेतील हिरोसोबतचं जमली जोडी; राजकीय नेत्याशी जवळचा संबंध
जमलं ! लोकप्रिय अभिनेत्रीची मालिकेतील हिरोसोबतचं जमली जोडी; राजकीय नेत्याशी जवळचा संबंध
Namita Thapar: नमाजचे फायदे सांगणं भोवलं, शार्क टँक फेम नमिता थापर ट्रोल; सडेतोड उत्तर देत म्हणाली..
नमाजचे फायदे सांगणं भोवलं, शार्क टँक फेम नमिता थापर ट्रोल; सडेतोड उत्तर देत म्हणाली..
Aai Tuljabhavani Marathi Serial: महादेवांचं वऱ्हाड, पंचदेवींची ओवाळणी… ‘आई तुळजाभवानी’त अलौकिक लग्नाचा जल्लोष
महादेवांचं वऱ्हाड, पंचदेवींची ओवाळणी… ‘आई तुळजाभवानी’त अलौकिक लग्नाचा जल्लोष
Jai jai Swami Samarth Colours Marathi Serial: भक्तासाठी काळालाही आव्हान देणार स्वामी... 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत पाहायला मिळणार 'अध्याय महानिर्वाणाचा'
भक्तासाठी काळालाही आव्हान देणार स्वामी... 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत पाहायला मिळणार 'अध्याय महानिर्वाणाचा'

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News : लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
Video: बारामतीमधील सभेसाठी मी पवारसाहेबांचा मेसेज; प्रफुल पटेलांनी सांगता सभेत सांगितलं, रोहित पवारांबद्दलही बोलले
Video: बारामतीमधील सभेसाठी मी पवारसाहेबांचा मेसेज; प्रफुल पटेलांनी सांगता सभेत सांगितलं, रोहित पवारांबद्दलही बोलले
Share Market : सेन्सेक्स निफ्टी सुस्साट, शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांनी 3 लाख कोटी कमावले, कारण समोर
शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांनी 3 लाख कोटी कमावले, ट्रम्प कनेक्शन समोर
फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 1 ठार चार गंभीर जखमी, अनधिकृत फटाके कारखान्यांचा सुळसुळाट
फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 1 ठार चार गंभीर जखमी, अनधिकृत फटाके कारखान्यांचा सुळसुळाट
Dharashiv : धाराशिव जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्लिश शिक्षणाचा प्रयोग; 1068 प्रस्ताव सादर
धाराशिव जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्लिश शिक्षणाचा प्रयोग; 1068 प्रस्ताव सादर
लातूर पॅटर्नचे जनक, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शोक
लातूर पॅटर्नचे जनक, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शोक
योगी, आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जातायंत इकडे विनयभंग होतात; उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल
योगी, आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जातायंत इकडे विनयभंग होतात; उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल
Raja Shivaji Movie: राजा शिवाजी चित्रपटाच्या ट्रेलरमधील नजर खिळवून ठेवणाऱ्या 15 फ्रेम्स, वाघनखं अन् अफजलखानाच्या वधाचा प्रसंग
राजा शिवाजी चित्रपटाच्या ट्रेलरमधील नजर खिळवून ठेवणाऱ्या 15 फ्रेम्स, वाघनखं अन् अफजलखानाच्या वधाचा प्रसंग
Embed widget