VIDEO : 'पुनर्जन्म झाला तर आंबेडकर बनायचंय', गांगुलीच्या प्रश्नावर मिस इंडिया ठरलेल्या अभिनेत्रीने दिलं होतं उत्तर
Celina Jaitly : VIDEO : 'पुन्हा जन्म झाला तर आंबेडकर बनायचंय', गांगुलीच्या प्रश्नावर मिस इंडिया ठरलेल्या अभिनेत्रीने दिलं होतं उत्तर

Celina jaitly : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिनेत्री सेलिना जेटली हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून त्यांना अभिवादन केलंय. सेलिनाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देते आणि म्हणते, "जर माझा पुनर्जन्म झाला तर मला भीमराव आंबेडकर व्हायला आवडेल."
View this post on Instagram
भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची सोमवारी 134 वी जयंती आहे. इंस्टाग्रामवर मिस इंडिया युनिव्हर्सशी संबंधित एक व्हिडिओ शेअर करताना सेलिनाने सांगितले की तिला कोणते प्रश्न विचारले गेले आणि तिने कोणती उत्तरे दिली.
सेलिनाने शेअर केला जुना व्हिडीओ
इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना सेलिनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आज आंबेडकर जयंती आहे. भीमराव रामजी आंबेडकर (14 एप्रिल 1891 - 6 डिसेंबर 1956) यांच्या वारशाची आठवण ठेवून, माझ्या दिवंगत लष्करी वडिलांनी आणि आईने एमएचओडब्ल्यू (डॉ. आंबेडकर नगर, मध्य प्रदेश) हे आमचे घर म्हणून निवडले आणि मला डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जन्मस्थळावरील प्रेमाचा वारसा भेट दिला. त्यांच्या माध्यमातून, मी अशा माणसाच्या प्रवासाशी जोडू शकलो ज्याने देश आणि मला देखील बदलून टाकले.
सेलिनाने व्हिडिओमध्ये सौरव गांगुलीच्या प्रश्नाला दिले होते उत्तर
व्हिडिओमध्ये, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली सेलिनाला हा प्रश्न विचारतो की, "जर तुमचा पुनर्जन्म झाला तर तुम्हाला काय म्हणून जन्म घ्यायला आवडेल आणि का?" या प्रश्चाचे उत्तर देताना सेलिना म्हणते की, "मी नेहमीच त्यांच्याविषयी बोलत आले आहे त्यांचा सन्मान करते. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून डॉ. भीमराव आंबेडकर आहेत. तुम्ही विचारला का? तर मी त्यांच्या अफाट विद्वत्तेचा आणि ज्ञानाचा सन्मान करते. त्यांचे ज्ञान, त्यांचे तत्वज्ञान, त्यांच्या सामाजिक सुधारणा आणि त्यांनी भारतातील जातिव्यवस्था नष्ट केली. हे त्यांचं फार मोठं काम आहे. त्यांनी भारतीय राज्यघटना लिहिली. जर माझा पुर्नजन्म झाला आणि मी भारताचे संविधान लिहिले तर लोक मला देखील त्यांच्याप्रमाणे कायम लक्षात ठेवतील.
अभिनेत्री मलायका अरोरा देखील सेलिनाच्या शेजारी उभी असल्याचे दिसून आले होते. सेलिनाने 2001 मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला आणि 2001 च्या मिस युनिव्हर्समध्ये ती चौथी उपविजेती होती
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या



















