एक्स्प्लोर
MVA Rift: 'राज ठाकरे सोडाच, उद्धव ठाकरें सोबतही नाही', भाई जगताप यांचा स्वबळाचा नारा
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Elections) तोंडावर महाविकास आघाडीत (MVA) ऐक्याऐवजी मतभेद उफाळून आले आहेत. काँग्रेस नेते भाई जगताप (Bhai Jagtap) आणि विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी ठाकरे बंधूंच्या (Thackeray Brothers) संभाव्य युतीवरून परस्परविरोधी भूमिका घेतल्याने पक्षातच फूट पडल्याचे चित्र आहे. 'राज ठाकरे सोडाच, पण आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही मुंबईत लढणार नाही,' असे ठाम मत काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मांडले आहे. स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा स्वबळावर लढण्याची असल्याने हा निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले. तर दुसरीकडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी दोन भाऊ एकत्र येत असतील तर त्याला विरोध करण्याचे कारण नाही, असे सांगत एकप्रकारे भाई जगताप यांच्या भूमिकेला छेद दिला आहे. दरम्यान, काँग्रेस नेत्यांच्या या भूमिकांवर मनसेने संतप्त प्रतिक्रिया दिली असून, 'आमच्याकडे कोणी युतीचा प्रस्ताव दिला आहे का?' असा सवाल केला आहे. या सर्व घडामोडींमुळे आता काँग्रेस हायकमांड नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : मतदानाची वेळ संपली, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election Wedding : आधी मतदान, नंतर लगीनगाठ
Nagarpanchyat Election : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, निकाल 21 डिसेंबरला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
नाशिक
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion

















