(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pathaan Teaser: शाहरुख आणि जॉनचा खास लूक तर दीपिकाचा ग्लॅमरस अंदाज; पठाणचा जबरदस्त टीझर रिलीज
शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमधील जबरदस्त डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Pathaan Teaser: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खाननं (Shah Rukh Khan) त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास गिफ्ट दिलं आहे. नुकत्याच त्याच्या पठाण (Pathaan) या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटात शाहरुखसोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता जॉन अब्राहम (john abraham) यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. 25 जानेवारी 2023 रोजी पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. केवळ हिंदी भाषेतच नाही तर तमिळ आणि तेलगू या भाषांमध्ये देखील हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.
'क्या जानते हो तुम पठान के बारे में....?' हा डायलॉग पठाणच्या टीझरच्या सुरुवातीला ऐकू येतो. त्यानंतर शाहरुखचा जबरदस्त लूक दिसतो. टीझरमधील डायलॉग्स आणि अॅक्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे. तसेच टीझरमध्ये दीपिका आणि शाहरुखचा रोमँटिक अंदाज आणि जॉनचा खास लूक दिसत आहे. हा टीझर शाहरुखनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. टीझर शेअर करुन शाहरुखनं कॅप्शनमध्ये लिहिलं, अपनी कुर्सी की पेटी बांध लीजिये. पठाणचा टीझर रिलीज झाला आहे.' या टीझरला शाहरुखच्या चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.
पाहा पठाण चित्रपटाचा टीझर :
Apni kursi ki peti baandh lijiye…#PathaanTeaser OUT NOW! Celebrate #Pathaan with #YRF50 only at a big screen near you on 25th January, 2023. Releasing in Hindi, Tamil and Telugu. @deepikapadukone | @TheJohnAbraham | #SiddharthAnand | @yrf pic.twitter.com/eZ0TojKGga
— Shah Rukh Khan (@iamsrk) November 2, 2022
रिपोर्टनुसार, पठाण या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी शाहरूखनं 85 कोटी रूपये मानधन घेतलं. 'ओम शांती ओम' आणि 'चेन्नई एक्सप्रेस' या चित्रपटांमधील शाहरूख आणि दीपिका यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता पठाण या चित्रपटात या जोडीला पुन्हा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. पठाण चित्रपटाबरोबरच शाहरुखचा जवान हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 2 जून 2023 रोजी जवान हा चित्रपट रिलीज होणार आहे. नयनतारा आणि विजय सेतुपती यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. शाहरुखच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
काही दिवसांपूर्वी शाहरुख ब्रह्मास्त्र या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटात त्याने सुमारे 20 मिनिटांचा कॅमिओ केला. व्यक्तिरेखा लहान असली तरी शाहरुखनं त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. काही नेटकऱ्यांनी ब्रह्मास्त्र या चित्रपटामधील शाहरुखच्या लूकचा फोटो शेअर केला होता.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Pathan : चार वर्षानंतर शाहरूख खान करतोय मोठ्या पड्यावर पुनरागमन ; 'पठाण' साठी घेतलं एवढं मानधन