Box Office Report : बॉक्स ऑफिसवरचा बादशाह शाहरुख खान! 'गांधी गोडसे एक युद्ध' बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला
Pathaan : 'गांधी गोडसे एक युद्ध' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे.
Pathaan And Gandhi Godse Ek Yudh Box Office Report : सिनेप्रेक्षकांची पाऊले सिनेमागृहाकडे वळत आहेत. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर दुसरीकडे राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांचा 'गांधी गोडसे एक युद्ध' (Gandhi Godse Ek Yudh) हा सिनेमा रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर 'पठाण' आणि 'गांधी गोडसे एक युद्ध' हे सिनेमे आमने-सामने आहेत.
'पठाण' आणि 'गांधी गोडसे एक युद्ध' हे दोन्ही सिनेमे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. पण तरीही वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमांची सिनेरसिक प्रतीक्षा करत होते. 'पठाण'च्या माध्यमातून शाहरुखने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं आहे. तर दुसरीकडे 'गांधी गोडसे एक युद्ध' या सिनेमाच्या माध्यमातून राजकुमारी संतोषी यांनी नऊ वर्षांनी पुन्हा एकदा सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे.
'गांधी गोडसे एक युद्ध' बॉक्स ऑफिसवर आपटला
राजकुमार संतोषी दिग्दर्शित 'गांधी गोडसे एक युद्ध' हा सिनेमा 26 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सिनेमावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. पण तरीही राजकुमार संतोषी यांनी सिनेमाचं प्रमोशन केलं. या सिनेमात दीपक अंतानी, चिन्मय मांडलेकर मुख्य भूमिकेत आहेत. 45 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. पण 'ओपनिंग डे'ला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडला आहे.
मराठी सिनेसृष्टीचं कसं होणार?
'पठाण' हा सिनेमा रिलीज होण्यासाठी रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखचा 'वेड' हा मराठी सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करत होता. रिलीजच्या दोन आठवड्यांत या मराठी सिनेमाने 50 कोटींपेक्षा अधिक कमाई करत अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. त्यामुळे हा सिनेमा नागराज मंजुळेंच्या 'सैराट'चा रेकॉर्ड मोडणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. 'वाळवी' हा मराठी सिनेमादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. 'पठाण'च्या रिलीजचा 'सरला एक कोटी'च्या निर्मात्यांनाही मोठा फटका बसला आहे. अनेक थिएटर्सने या सिनेमाचे शो चक्क काढून टाकले आहेत.
बॉक्स ऑफिसचा बादशाह शाहरुख खानच!
शाहरुख खानच्या 'पठाण'ची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. पैसा वसुल सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांची पाऊले पुन्हा-पुन्हा सिनेमागृहाकडे वळत आहेत. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 57 कोटींची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 65 कोटींची कमाई केली आहे. अशाप्रकारे रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने 120 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे शाहरुख खान बॉक्स ऑफिसवरचा बादशाह आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :