Boney Kapoor : बोनी कपूर यांना सायबर फसवणुकीचा फटका; आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बोनी कपूर (Boney Kapoor) यांची सायबर भामट्याने 3.82 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
Boney Kapoor : प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माते बोनी कपूर (Boney Kapoor) यांची सायबर भामट्याने 3.82 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी आंबोली पोलीस ठाण्यात सायबर फसवणूक करणाऱ्याविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात ही रोकड गुडगाव येथील कंपनीच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आली होती. आंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कपूर यांचे कार्यालय असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कपूर यांच्या वतीने त्यांच्या व्यवस्थापकाने गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांनी सांगितले की नऊ फेब्रुवारी रोजी फसवणूक झाली आणि मार्चमध्ये कपूर यांना फसवणूक झाल्याचे समजले.
त्यानंतर त्यांनी बँकेकडे धाव घेतली. आणि कन्फर्मेशन मिळाल्यानंतर पोलिसात लेखी तक्रार दिली. लेखी तक्रारीत त्याने स्पष्ट नमूद केले होते की त्याने कधीही त्याच्या क्रेडिट कार्डशी संबंधित कोणतेही तपशील शेअर केले नाहीत. तसेच त्याला सायबर घोटाळेबाजांकडून कोणताही कॉल आला नव्हता. पोलिसांनी सांगितले की, 'फसवणूक करण्यासाठी कार्डच्या डेटाचा गैरवापर केल्याचे दिसते.' बोनी कपूर यांनी वॉन्टेड, वो सात दिन आणि हम पांच या चित्रपटांची निर्मीती केली आहे. तसेच ते बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आहेत. तसेच ते दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे पती आहेत. बोनी यांना अंशुला कपूर आणि अभिनेता अर्जुन कपूर आणि ही दोन मुलं आहेत. बोनी यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत असते.
संबंधित बातम्या
- Happy Birthday Dilip Joshi : कधीकाळी 50 रुपये मानधन घेणारे दिलीप जोशी आज आहेत कोट्यवधींचे मालक; एका एपिसोडसाठी घेतात एवढे मानधन
- Heropanti 2 : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर टायगर श्रॉफचा 'हीरोपंती 2' आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
- BE Rojgaar : तीन बेरोजगारांची गोष्ट; ‘BE Rojgaar’ चा पहिला एपिसोड पाहिलात?