एक्स्प्लोर

कंगना रनौत आणि रंगोली चंदेलला हायकोर्टाचा अटकेपासून दिलासा

मुंबई उच्च न्यायालयानं कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांनी तूर्तास अटक करू नका असे निर्देश मुंबई पोलिसांना दिले आहेत.

मुंबई : सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाबद्दल अपमानकारक पोस्ट अपलोड केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रनौतला हायकोर्टानं दिलासा दिला आहे. जर आम्ही त्यांना दिलासाच दिला नाही तर राज्याबाहेरून त्या इथं येतीलच कशा?, त्यामुळे पुढील चौकशीसाठी त्यांना दिलासा देत आहोत असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयानं कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांनी तूर्तास अटक करू नका असे निर्देश मुंबई पोलिसांना दिले आहेत. आपल्या विरोधातील एफआयआर रद्द करावा अशी मागणी करत कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेलनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

आपण घरातील लग्न समारंभात व्यस्त होतो, तसेच या लग्न समारंभानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही स्वत:ला विलगीकरणात ठेवलं होतं. त्यामुळे चौकशीला हजर राहता आलं नाही, असं त्यांनी हायकोर्टात सांगितलं. आपण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पोलिसांपुढे हजर होऊ अशी हमी कंगनानं वकिलांमार्फत हायकोर्टात दिली. त्यावर हायकोर्टानं दोन्ही बहिणींना 8 जानेवारी रोजी वांद्रे पोलीस स्थानकांत हजर राहण्याची सूचना करत प्रकरण 11 जानेवारीपर्यंत तहकूब केलं आहे. तोपर्यंत याचिकाकर्त्यांनी याप्रकरणात कुठेही आक्षेपार्ह विधान करू नये असे निर्देशही दिले आहेत. पुढील सुनावणीपर्यंत कंगना आणि तिच्या बहिणीला अटकेपासून दिलेला दिलासा कायम राहील.

मुंबई पोलिसांसाठी कार्यशाळा आयोजित करण्याची गरज, असं का म्हणालं हायकोर्ट?

न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान हायकोर्टानं मुंबई पोलिसांचेही चांगलेच कान टोचले. सरकारी वकिलांनी पोलिसांसाठी कार्यशाळा आयोजित करण्याची गरज आहे. कारण कोणत्या प्रकरणात कोणती कलमं लावावीत हे त्यांमा समजत नाही. याचा प्रत्यय हल्ली आम्हाला सर्रासपणे येऊ लागलाय अशी टिप्पणी खंडपीठानं केली. त्याचसोबत आपल्या मुलभूत अधिकारांची भाषा करताना इतरांच्याही मुलभूत अधिकारांबाबत विचार करावा. कधी कधी एखाद्या गोष्टीवर किंवा घटनेवर उगाच व्यक्त न होता शांत राहणं हाही एक मुलभूत अधिकारच आहे असं मतही खंडपीठानं नमूद केलं.

काय आहे प्रकरण?

कंगनाची बहीण रंगोली हिने तबलिगी समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करत समाजात जातीय तेढ निर्माण होईल असं एक ट्विट केले होतं. सोशल मीडियावर त्यावर बराच विरोध आणि टीका सुरू होताच आपल्या बहिणीला पाठिंबा दर्शवत कंगनानंही एक व्हिडिओ ट्विटरवर अपलोड केला होता. याप्रकरणी अॅड. अली काशिफ खान देशमुख यांनी अंधेरी कोर्टात त्याबाबत तक्रार दिली होती. या तक्रारीची दखल घेत या प्रकरणातील पुरावे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असल्याने पुढील कारवाईसाठी चौकशी होणं आवश्यक असल्याचे कोर्टाने स्पष्ट केलं. तसेच संबंधित व्यक्तीची या प्रकरणात नेमकी भूमिका काय होती? हे कळणं गरजेचं असल्यानं याबाबतचा चौकशी अहवाल दिलेल्या मुदतीत पोलिसांनी सादर करावा असा आदेश न्यायाधीशांनी दिला आहेत.

कोर्टाच्या या निर्देशांनुसार मुंबई पोलिसांनी यासंदर्भात एक तक्रार नोंदवली गेली. त्यानुसार कंगना व तिच्या बहिणी विरोधात मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून त्याच्या चौकशीसाठी 23 व 24 नोव्हेंबर रोजी हजर होण्यास दोघींना तिसरे समन्स धाडले होते. मात्र त्या चौकशीसाठी हजर झाल्या नाहीत. दंडाधिकारी न्यायालयाच्या या आदेशाला आक्षेप घेत कंगनानं आता हायकोर्टात धाव घेतली आहे. पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करावा तसेच पाठवलेल्या समन्सला स्थगिती द्यावी अशी मागणी करत अॅड. रिझवान सिद्दीकी यांच्यामार्फत कंगना व तिची बहीण रंगोलीने याचिका दाखल केली आहे. तसेच जोपर्यंत यावर सुनावणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपल्या विरोधात पोलिसांनी कोणतीही कठोर कारवाई करू नये अशी विनंतीही कंगनाने या याचिकेद्वारे केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Colors Marathi Serials: ‘स्वामीं’वरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
‘स्वामीं’वरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
Priyanka Chopra Hollywood Film Entry: प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या'ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या' ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
Aai Kuthe Kay Karte Actress in Eetha: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Embed widget