Zara Hatke Zara Bachke: प्रेम, लग्न अन् घटस्फोट, कपिल आणि सौम्याची हटके स्टोरी; 'जरा हटके जरा बचके' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज
and 'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke Zara Bachke) या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
Zara Hatke Zara Bachke: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) यांच्या 'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke Zara Bachke) या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट 2 जून रोजी रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर विकी आणि सारानं सोशल मीडियावर शेअर केलं होतं. आता या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये कपिल आणि सौम्याची हटके स्टोरी दाखवण्यात आलं आहे. कपिल सौम्याच्या आयुष्यात काय घडतं? हे प्रेक्षकांना 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटात बघायला मिळणार आहे.
'जरा हटके जरा बचके' या चित्रपटात सौम्या आणि कपिल या इंदूरच्या मध्यमवर्गीय विवाहित जोडप्याची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. 'जरा हटके जरा बचके' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, कपिल आणि सौम्या हे एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यानंतर त्यांचे लग्न होते. पण नंतर सौम्या आणि कपिल हे घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात. आता सौम्या आणि कपिलला घटस्फोट का घ्यायचा आहे? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट बघावा लागेल. 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सारा आणि विकी यांच्यामधील केमिस्ट्री दिसत आहे, तसेच दोघांचा विनोदी अंदाज देखील दिसत आहे.
पाहा ट्रेलर
'जरा हटके जरा बचके' कधी होणार रिलीज?
'जरा हटके जरा बचके' हा विकी आणि साराचा चित्रपट 2 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विकी आणि सारासोबतच या चित्रपटात राकेश बेदी, शारीब हाश्मी, नीरज सूद हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
2019 मध्ये रिलीज झालेल्या उरी चित्रपटानंतर विकीचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकला नाही. तर साराच्या लव्ह आजकल, कुली नंबर 1, गॅसलाइट या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही. आता 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल का या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल.
इतर महत्वाच्या बातम्या: