Vivek Agnihotri : "त्याने नशेत माझ्याबरोबर..."; विवेक अग्निहोत्रीवर महिलेचा गैरवर्तनाचा आरोप
Vivek Agnihotri : विवेक अग्निहोत्रीने नशेत एका महिलेबरोबर गैरवर्तन केलं आहे.
Kangana Ranaut On Vivek Agnihotri : विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द व्हॅक्सिन वॉर' (The Vaccine War) हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. ओपनिंग डे पासूनच या सिनेमाचे आकडे खूप निराशाजनक आहेत. अशातच आता एका महिलेने अग्निहोत्रीने नशेत गैरवर्तन केल्याचा जाहीर आरोप केला आहे. याप्रकरणावर 'पंगाक्वीन' कंगना रनौतनेही (Kangana Ranaut) भाष्य केलं आहे.
विवेक अग्निहोत्रीच्या 'द व्हॅक्सिन वॉर' या सिनेमाचं कंगना रनौत समर्थन करत आहे. तिने ट्वीट केलं आहे की,"कोणत्याही सिनेमाबद्दल तुम्हाला इतकं वाईट का लिहायचं असतं? यश म्हणजे फक्त पैसा? सर्व कलाकारांचा तुम्ही असा अपमान का करता? आता रिलीज झालेल्या सिनेमांपैकी 'द व्हॅक्सिन वॉर' या सिनेमाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे".
सर्वच सिनेमे यशस्वी होत नाहीत : कंगना रनौत
कंगनाने पुढे लिहिलं आहे,"हा चांगला सिनेमा यशस्वी झालेला नाही का? सर्व कलाकृतींमध्ये तुम्ही नफा का पाहता? काही कलाकृती यशस्वी होतात काही होत नाहीत. पण तुमच्यासारख्या लोकांना लाज वाटायला हवी. सिनेमा काय असतो हे न कळणारे तुम्ही घरी बसून फक्त टीका, आरोप करत राहता. चांगला सिनेमा कोणता हे ठरवण्याचं धाडस कसं करता?".
Don’t support him my love. Nobody can be more nasty than Vivek Agnihotri. He drunk abused me. He’s far from being an artist.
— Seetu Mahajan Kohli (@kohliseetu) September 30, 2023
See what he said about @iamsrk also.
He doesn’t need any empathy especially from a straight shooter like you. https://t.co/ukOoxzqCCx
कंगना रनौतचं ट्वीट रिट्वीट करत सीतू कोहली नामक महिलेने लिहिलं आहे,विवेक अग्निहोत्रीसारख्या व्यक्तीचं समर्थन करू नकोस. त्याच्याएवढा वाईट कोणीच असू शकत नाही. नशेत असताना त्याने माझ्यासोबत गैरवर्तन केलं आहे. तो चांगला कलाकारदेखील नाही. तुझ्यासारख्या लोकांकडून त्याला सहानुभूती हवी आहे".
महिलेच्या ट्वीटला उत्तर देत कंगना रनौतने लिहिलं आहे,"मी प्रत्येकासाठीच उभी आहे. मला बरबाद करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकासाठीच मी उभी आहे. सर्वांचं भलं करण्यासाठी मी प्रयत्न करत राहणार".
I stand for every one I stood for even those who did everything in their capacity to ruin me, I stand for better future and collective well being.
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 30, 2023
संबंधित बातम्या