The Vaccine War : गांधी जयंतीनिमित्त 'द व्हॅक्सिन वॉर' सिनेमाची खास ऑफर; विवेक अग्निहोत्रींनी ट्वीट करत दिली माहिती
Tha Vaccine War : विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द व्हॅक्सिन वॉर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Vivek Agnihotri The Vaccine War Ticket Offer : विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द व्हॅक्सिन वॉर' (The Vaccine War) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात मात्र कमी पडला आहे. आता गांधी जयंतीनिमित्त (Gandhi Jayanti 2023) अग्निहोत्रींनी या सिनेमाची खास ऑफर ठेवली आहे. ट्वीट करत त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
'द व्हॅक्सिन वॉर'ची खास ऑफर
विवेक अग्निहोत्री यांनी 'द व्हॅक्सिन वॉर' या सिनेमाची एका तिकीटावर एक फ्री अशी ऑफर ठेवली आहे. अग्निहोत्रींनी ट्वीट केलं आहे,"मित्रांनो, आज रविवार आणि गांधी जयंतीच्या सुट्टीच्या निमित्ताने, तुमच्या कुटुंबासोबत #TheVaccineWar पाहा आणि मोफत तिकीट मिळवा. हे मोफत तिकीट तुमच्या घरातील मोलकरीण किंवा कोणत्याही स्त्री/मुलीला द्या. तुम्हालाही आनंद मिळेल.
दोस्तों, आज रविवार और गांधी जयंती की छुट्टी के मौक़े पे सपरिवार #TheVaccineWar देखने जायें और एक टिकट FREE पायें यह free टिकट आप अपने घर की maid या किसी महिला/कन्या को दें। उन्हें और आपको आनंद मिलेगा। pic.twitter.com/TSbIficDKp
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) October 1, 2023
विवेक अग्निहोत्री यांनी 'द व्हॅक्सिन वॉर' या सिनेमाचं पोस्टर शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. या पोस्टरवर 'नारी शक्ती ही भारत शक्ती है' असं लिहिलेलं दिसत आहे. भारतीय वैज्ञानिकांच्या संर्घषाची गोष्ट तुमच्या कुटुंबियांसोबत पाहा". त्यांच्या या पोस्टवर लोकांना तुमच्या या सर्व गोष्टी माहिती आहेत. सिनेमात दम असता तर ऑफर ठेवण्याची गरज भासली नसती, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
'द व्हॅक्सिन वॉर'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (The Vaccine war Box office Collection)
'द व्हॅक्सिन वॉर' हा सिनेमा 28 सप्टेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने फक्त 0.85 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 0.9 कोटी, तिसऱ्या दिवशी 1.75 कोटी आणि चौथ्या दिवशी 2.50 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत रिलीजच्या चार दिवसांत या सिनेमाने सहा कोटींचा गल्ला जमवला आहे.
'द व्हॅक्सिन वॉर' या सिनेमात नाना पाटेकर, पल्लवी जोशी, रायमा सेन, अनुपम खेर, गिरिजा ओक, निवेदिता भट्टाचार्य, सप्तमी गौडा आणि मोहन कपूर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. विवेक अग्निहोत्रीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तामिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी, पंजाबी, गुजराती, मराठी आणि बंगाली अशा दहा भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.
संबंधित बातम्या