एक्स्प्लोर
एक दिवसाचा मुख्यमंत्री होणार का? 'नायक' अनिल कपूर म्हणतो...
बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांना 'एक दिवसाचा मुख्यमंत्री होणार का?' असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर अनिल कपूरने खूप मजेशीर उत्तर दिले.
पुणे : महाराष्ट्राच्या सत्तेचा तिढा सुटण्याची चिन्हं अद्याप तरी दिसत नाहीत. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांना 'एक दिवसाचा मुख्यमंत्री होणार का?' असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर अनिल कपूरने मजेशीर उत्तर दिले. 'मी नायक आहे आणि हेच माझ्यासाठी चांगलं आहे', असे म्हणत अनिल कपूरन यांनी त्या प्रश्नाला बगल दिली. पुण्यातील एका ज्वेलर्सच्या उद्घाटनाला अनिल कपूर उपस्थित होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
'नायक' या 2001 साली प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटात अनिल कपूर यांनी एक दिवसाचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. एका दिवसाचा मुख्यमंत्री होऊनही राज्यात किती बदल होऊ शकतात, हे या चित्रपटात पहायला मिळाले होते. याच अनुषंगाने अनिल कपूर यांना पुण्यातील पत्रकारांनी एक दिवसाचा मुख्यमंत्री होणार का? असे विचारले, त्यावर अनिल कपूर म्हणाले की, बरेच जण मला म्हणतात तुम्ही मुख्यमंत्री व्हा, त्या सर्वांना मी एकच सांगतो मी नायकच बरा आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट होऊन नऊ दिवस उलटले आहेत. परंतु अद्याप राज्यात कोणत्याही पक्षाने सत्तास्थापन केलेली नाही. त्यामुळे सध्या व्हॉट्सअॅपवर अनेक जोक्स आणि मिम्स व्हायरल होऊ लागले आहेत. मंत्रीमंडळाची स्थापना होईपर्यंत अनिल कपूर यांना माहाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद द्यावं, अशी गंमतीशीर मागणी या जोक्स आणि मिम्सद्वारे केली जात आहे. यावरुन अनिल कपूर यांना पत्रकारांनी एक दिवसाचा मुख्यमंत्री होशील का? असा प्रश्न विचारण्यात आला होता.
पाहा काय म्हणाले अनिल कपूर?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement