एक्स्प्लोर

Shweta Bachchan husband Nikhil Nanda: बिग बींच्या जावयाचं शिक्षण किती? प्रसिद्ध उद्योगपती अन् कपूर घराण्याशी खास नातं; जाणून घ्या श्वेता बच्चनच्या पतीबद्दल...

Shweta Bachchan husband Nikhil Nanda: श्वेताचे पती निखिल नंदा (Nikhil Nanda) हे लाईमलाईटपासून दूर असतात. जाणून घेऊयात निखिल नंदा यांच्याबद्दल... 

Shweta Bachchan husband Nikhil Nanda: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी त्यांचा जुहू भागातला प्रतीक्षा बंगला आपल्या मुलीच्या नावावर केला आहे. बिग बींची लेक श्वेता बच्चन (Shweta Bachchan) ही नेहमीच चर्चेत असते. नव्या आणि अगस्त्या ही श्वेताची मुलं देखील चर्चेत असतात पण श्वेताचे पती निखिल नंदा (Nikhil Nanda) हे लाईमलाईटपासून दूर असतात. जाणून घेऊयात निखिल नंदा यांच्याबद्दल... 

कोण आहेत निखिल नंदा? (Who Is Shweta Bachchan Husband Nikhil Nanda)

निखिल नंदा हे प्रसिद्ध उद्योगपती आहेत. त्यांचा जन्म 18 मार्च 1974 रोजी झाला. निखिल नंदा यांचे वडिल राजन नंदा हे देखील उद्योगपती होते. 1997 मध्ये निखिल नंदा यांनी अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चनसोबत लग्नगाठ बांधली निखिल आणि श्वेता यांना नव्या आणि अगस्त्या ही दोन मुलं आहेत. 

निखिल नंदा यांचे शिक्षण (Nikhil Nanda Education)

 निखिल नंदा यांनी डेहराडूनमधील प्रतिष्ठित दून शाळेत शिक्षण घेतले. नंतर त्यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमध्ये  बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले.  निखिल नंदा यांचे फायनान्स आणि मार्केटिंगमध्ये स्पेशलायझेशन आहे.

निखिल नंदा यांची कंपनी (Nikhil Nanda Business)

एस्कॉर्ट्स लिमिटेड या कंपनीचे  निखिल नंदा हे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक  आहेत. 2018 मध्ये  निखिल यांनी वडील राजन नंदा यांच्याकडून त्यांच्या बिझनेसचा कारभार हाती  घेतला. एस्कॉर्ट्स लिमिटेड ही कंपनी निखिलचे आजोबा हर प्रसाद नंदा यांनी 1944 मध्ये स्थापन केली. ही कंपनी एक अभियांत्रिकी फर्म आहे. ही कंपनी उत्पादने विकसित करण्याच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनासाठी ओळखली जाते. या कंपनीचे  नाव तुम्ही अनेक ट्रॅक्टर, क्रेन आणि रोड रोलर्सवर पाहिले असेल.

निखिल नंदा आणि कपूर घराण्याचे खास नाते (Nikhil Nanda Family)

निखिल नंदा यांची आई रितु नंदा या राज कपूर (Raj Kapoor) यांच्या कन्या आहेत. त्यामुळे निखिल नंदा यांचे कपुर घराण्याशी खास नाते आहे. ऋषी कपूर, रणधीर कपूर, राजीव कपूर हे निखिल नंदा यांचे मामा आहेत तर रीमा कपूर या निखिल नंदा यांची मावशी आहेत. 

निखिल नंदा यांची मुलं (Nikhil Nanda Children's)

निखिल नंदा आणि श्वेता बच्चन यांना नव्या नवेली नंदा आणि अगत्स्य नंदा ही दोन मुले आहेत.  नवेली नंदाचा स्वत:चा पॉडकास्ट शो आहे तर अगत्स्य नंदा हा लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. त्याचा “द आर्चीज” हा चित्रपट लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

PHOTO: अमिताभ बच्चन यांच्याकडून मुलीला बंगला भेट; किंमत ऐकून तुम्हीही व्हाल हैराण!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget