VIDEO : जेव्हा अमिताभ बच्चन यांच्यासमोरच जया बच्चन आणि रेखानं मारली मिठी, अवॉर्ड शोमधील व्हिडीओ व्हायरल
Jaya Bachchan & Rekha Hug Video : अमिताभ बच्चन यांची पत्नी जया बच्चन आणि अभिनेत्री रेखाचा मिठी मारतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
![VIDEO : जेव्हा अमिताभ बच्चन यांच्यासमोरच जया बच्चन आणि रेखानं मारली मिठी, अवॉर्ड शोमधील व्हिडीओ व्हायरल when rekha hugged jaya bachchan at award show after amitabh bachchan won best actor award for piku movie watch video marathi news VIDEO : जेव्हा अमिताभ बच्चन यांच्यासमोरच जया बच्चन आणि रेखानं मारली मिठी, अवॉर्ड शोमधील व्हिडीओ व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/26/9bd31d1b7bfde9315a29bcc4421301441722011514138322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rekha-Jaya Bachchan Hug : बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि त्यांचं कुटुंब सध्या चर्चेचा विषय बनलं आहे. अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि त्यांची सून ऐश्वर्या राय यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दोघांमधील दुरावा घटस्फोटापर्यंत पोहोचल्याचं सांगितलं जात आहे. यादरम्यान, ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबाचे अनेक जुने फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता अमिताभ बच्चन यांची पत्नी जया बच्चन आणि अभिनेत्री रेखाचा एक जुना व्हिडीओ चर्चेत आला आहे.
अमिताभ बच्चन, जया आणि रेखाचा जुना व्हिडीओ व्हायरल
बिग बी अमिताभ बच्चन त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिले आहेत. रेखासोबतच्या त्यांच्या अफेअरच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या, या दोघांनी कधीही आपलं नातं अधिकृतपणे मान्य केलं नाही. पण, रेखाने अनेक मुलाखतींमध्ये अमिताभ बच्चन यांच्यावरील प्रेम व्यक्त केलं होतं, पण बिग बी यांनी त्यांच्या प्रेमाबद्दल कधीच काही सांगितलं नाही. रेखा आणि जया एकेकाळी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या, पण बिग बींसोबतच्या अफेअरनंतर त्यांची मैत्री संपली. एकदा एका अवॉर्ड फंक्शनमध्ये रेखाने जाऊन जयाला मिठी मारली होती. जया आणि रेखाचा मिठी मारतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
बिग बींना मिळाला पुरस्कार अन् रेखाची जयाला मिठी
जया बच्चन आणि रेखा एकेकाळी खास मैत्रिणी होत्या. पण, अमिताभ बच्चन यांच्यासोबत रेखाचं नावं जोडलं गेल्यापासून त्यांच्यातील मैत्रीत कटुता आल्याचं बोलंल जातं. दरम्यान, अमिताभ बच्चन यांना 2015 मध्ये पिकू या चित्रपटासाठी स्टार स्क्रीन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी बिग बींच्या नावाची घोषणा होताच रेखा आणि जया बच्चन आपापल्या जागेवरून उठून उभ्या राहिल्या होत्या, त्यानंतर रेखाने जयाला मिठी मारली होती.
रेखाने जयाला मिठी मारली
बिग बींना पुरस्कार मिळाल्यावर रेखा इतकी खूश झाली की, तिने जया बच्चनकडे धाव जात मिठी मारत अभिनंदन केलं. यावेळी अमिताभ बच्चन पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर गेले होते. त्यानंतर दोघांनी एकत्र उभे राहून अमिताभ बच्चन यांना पुरस्कार स्वीकारताना पाहिलं. त्यावेळीही जया बच्चन आणि रेखा यांचा मिठी मारतानाचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या अफेअरची चर्चा
रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. मुकद्दर का सिकंदर, मिस्टर नटवरलाल, गंगा की सौगंध, सिलसिला अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये या दोघांची जोडी पाहायला मिळाली. रेखा आणि अमिताभ बच्चन यांची जोडी बॉलिवूडमधील टॉप कपल्सपैकी एक होती. दोघांची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली. त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या, रेखाने बिग बींवरील प्रेम वेळोवेळी व्यक्त केलं पण, अमिताभ यांनी त्यावर कधीही भाष्य केलं नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Aishwarya Abhishek Divorce : ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबातील दुराव्याचं कारण काय? सासू नाही तर 'या' व्यक्तीसोबत 36 चा आकडा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)