(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vivek Oberoi : अभिनेता विवेक ओबेरॉयची फसवणूक करणाऱ्या निर्मात्यास अटक; आरोपीस 7 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
Vivek Oberoi : अभिनेता विवेक ओबेरॉयची फसवणूक करणाऱ्या निर्मात्यास अटक करण्यात आली असून आरोपीस 7 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Vivek Oberoi : अभिनेता विवेक ओबेरॉयसोबत (Vivek Oberoi) चित्रपट निर्मितीसंबंधित फसवणूक केल्याप्रकरणी 'हड्डी'चा (Haddi) कथित निर्माता संजय शहाला (Sanjay Shah) एमआयडीसी पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. परिमंडळ-10 चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी शहाच्या अटकेला दुजोरा दिला. वांद्रे हॉलिडे कोर्टाने त्याला 7 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अभिनेता विवेक ओबेरॉयची फसवणूक करणाऱ्या निर्मात्यास अटक करण्यात आली असून आरोपीस 7 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या वर्षी 19 जुलै रोजी ओबेरॉयने चित्रपट निर्मितीमध्ये फसवणूक प्रकरणी MIDC पोलीस
ठाण्यात संजय शाह, नंदिता शाह आणि राधिका नंदा यांच्यासह त्यांच्या कंपनीच्या आनंदिता एंटरटेनमेंट एलएलपीच्या भागीदारांविरुद्ध एफआयआर दाखल केला. पोलिसांनी रविवारी रात्री चित्रपट निर्माता संजय शहा याला अटक केली. शहाला कोर्टातून रिमांडवर घेऊन पोलीस त्याची चौकशी करत आहेत. याप्रकरणी आणखी तीन ते चार जणांना अटक होण्याची शक्यता आहे.
नेमकं प्रकरण काय?
विवेक ओबेरॉय आणि त्याची पत्नी प्रियांकाची 1.55 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. एंटरटेनमेंट कंपनी आणि एका सिनेमाच्या निर्मितीसाठी ओबेराय यांना आरोपींनी 1.55 कोटी रुपये गुंतवण्यास सांगितले. तसेच पैसे गुंतवल्यानंतर यातून प्रचंड आर्थिक फायदा होणार असल्याचंही सांगण्यात आलं होतं. मात्र कोणत्याही सिनेमाची निर्मिती न करता आरोपींनी ती रक्कम स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वापरली.
विवेक ओबेरॉयने मुंबईतील एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. कलम 34, 409, 419 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. आता सिने-निर्माते संजय शहा, त्यांची आई नंदिता शाह, राधिका नंदा या आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून आता संजय शहा यांना पोलिसांना अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत.
बॉलिवूड गाजवणारा विवेक ओबेरॉय!
विवेक ओबेरॉयने 'कंपनी' (Company) या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. हिंदीसह त्याने तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि तामिळ सिनेमांतही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. विवेकचा पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरला होता. आजवर अभिनेत्याने पीएम नरेंद्र मोदी, ओमकारा, मस्ती, क्रिश 3, काल, साथिया, ग्रँड मस्ती अशा अनेक सुपरहिट सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. विवेक ओबेरॉय यांनी आजवर आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. अभ्यासू अभिनेता अशी त्यांची ओळख आहे. अभिनेत्याच्या आगामी सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या