Vivek Oberoi : विवेक ओबेरॉयची 1.55 कोटींची फसवणूक; एकाला अटक
Vivek Oberoi : अभिनेता विवेक ओबेरॉय फसवणूक प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.
Vivek Oberoi : अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) काही दिवसांपासून फसवणूक प्रकरणामुळे चर्चेत आहे. विकेकची 1.55 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. संजय शहा असे आरोपीचे नाव असून त्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
विवेक ओबेरॉयची 1.55 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप होता. याप्रकरणी जुलै महिन्यात तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी अभिनेत्याला सिनेनिर्मितीसाठी पैसे गुंतवायला लावले आणि स्वत:च्या फायद्यासाठी त्या पैशांचा वापर केला. आता याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
अभिनेता विवेक ओबेरॉयची 1.55 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. एंटरटेनमेंट कंपनी आणि एका सिनेमाच्या निर्मितीसाठी ओबेरॉय यांना आरोपींनी 1.55 कोटी रुपये गुंतवण्यास सांगितले होते. तसेच हे पैसे गुंतवल्यानंतर यातून आर्थिक फायदा होणार असल्याचंही सांगण्यात आलं. पण या आरोपींनी कोणत्याही सिनेमाची निर्मिती न करता त्या पैशांचा वापर स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी केला.
विवेक ओबेरॉय यांनी 21 जुलै 2023 रोजी मुंबईतील एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी याप्रकरणी कलम 34, 409, 419 आणि 420 अंतर्गत संजय शहा, नंदिता शाह, राधिका नंदा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला होता. आता पोलिसांनी संजय शहा या आरोपीला अटक केली आहे.
आरोपी - संजय शहा
विवेक ओबेरॉयबद्दल जाणून घ्या... (Who is Vivek Oberoi)
विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) हे लोकप्रिय अभिनेते सुरेश ओबेरॉय (Suresh Oberoi) यांचा मुलगा आहेत. 2002 मध्ये त्यांनी 'कंपनी' (Company) या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. अभिनेत्याचा पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरला होता. विवेक व्यावसायिक कामापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. विवेकच्या आगामी सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
विवेक ओबेरॉय यांनी तेलगू, मल्यळम, कन्नड आणि तामिळ सिनेमांत काम केलं आहे. 'रक्त चरित्र' आणि 'क्रिश 3' या सिनेमातील अभिनेत्याच्या कामाचं कौतुक झालं आहे. विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi Movies) यांनी पीएम नरेंद्र मोदी, ओमकारा, मस्ती, क्रिश 3, काल, साथिया, ग्रँड मस्ती अशा अनेक सुपरहिट सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. विवेक ओबेरॉय यांनी आजवर आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. अभ्यासू अभिनेता अशी त्यांची ओळख आहे.
संबंधित बातम्या