Vivek Oberoi : बॉलिवूडच्या लॉबिंगचा बळी ठरलो, विवेक ओबेरॉयचा धक्कादायक आरोप; म्हणाला अशा वेळी फक्त दोनच पर्याय उरतात...
Bollywood Vivek Oberoi : आपल्या आजवरच्या सिनेकारकिर्दीत विवेक ओबेरॉयने फार मोजकेच चित्रपट केले. अभिनयापेक्षा विवेकने आपले सगळे लक्ष व्यवसायावर केंद्रीत आहे.
Bollywood Vivek Oberoi : बॉलिवूडमध्ये 'कंपनी' या चित्रपटातून अभिनेता विवेक ओबेरॉयने (Vivek Oberoi) धडाकेबाज पदार्पण केले. त्याने काही हिट चित्रपटातही काम केले. काही महिन्यांपूर्वी विवेक ओबेरॉय हा रोहित शेट्टीच्या कॉप सीरिज 'इंडियन पोलीस फोर्स'मध्ये झळकला होता. त्यानंतर तो फार चित्रपटात झळकला नाही. आपल्या आजवरच्या सिनेकारकिर्दीत विवेक ओबेरॉयने फार मोजकेच चित्रपट केले. अभिनयापेक्षा विवेकने आपले सगळे लक्ष व्यवसायावर केंद्रीत आहे. आपण बॉलिवूडमधील लॉबिंगचे बळी असल्याचा दावा विवेकने एका मुलाखतीत केला.
विवेक ओबेरॉयला यशस्वी चित्रपट कारकीर्द असूनही व्यवसायाच्या जगात यावे लागले? असा प्रश्न विवेकच्या चाहत्यांना पडला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विवेक ओबेरॉयने या प्रश्नाचे उत्तर देताना धक्कादायक गौप्यस्फोट केला. बॉलिवूडमधील लाँबिंगचे आपण बळी होतो असे धक्कादायक दावा विवेकने केला. सिनेसृष्टीत एक सिस्टीम आहे, या सिस्टीमचे आपण बळी असल्याचे त्याने सांगितले.
त्यावेळी फक्त दोनच पर्याय....
विवेक ओबेरॉयने सांगितले की, मागील काही वर्षांपासून मी काही व्यवसाय करत आहे. माझ्या आयुष्यात एक वेळ अशी आली की माझे चित्रपट हिट झाले, माझ्या अभिनयाचे कौतुक झाले. तरीही इतर कारणांमुळे जर तुम्हाला भूमिका मिळत नसतील आणि तुम्ही सिस्टीम आणि लॉबीचे बळी होत असाल तेव्हा तुमच्याकडे फक्त दोनच पर्याय उरतात. त्यावेळी मग एकतर तुम्ही निराश व्हा किंवा आव्हान म्हणून स्वीकारा आणि स्वतःचे नशीब लिहा. मी नंतरचा मार्ग निवडला आणि नंतर अनेक व्यवसाय सुरू केले असल्याचे विवेक ओबेरॉयने म्हटले.
View this post on Instagram
सलमानसोबतच्या भांडणानंतर विवेक ओबेरॉयला उतरती कळा
वर्ष 2003 मध्ये अभिनेता विवेक ओबेरॉयचे अभिनेता सलमान खानसोबत भांडण झाले होते. त्यावेळी विवेक ओबेरॉयने एक पत्रकार परिषद घेऊन सलमानवर आरोप केले होते. सलमान हा ऐश्वर्याला धमकी देत असून मारझोड करत असल्याचे म्हटले. सलमानने मला देखील जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप विवेकने केला होता. या घटनेनंतर विवेक ओबेरॉयच्या सिनेकारकिर्दीला काहीसे ब्रेक लागल्याचे चित्र होते.