Vivek Oberoi : अभिनेता विवेक ओबेरॉयची फसवणूक; नेमकं प्रकरण काय?
Vivek Oberoi : अभिनेता विवेक ओबेरॉयची 1.55 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.
Vivek Oberoi : बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयची (Vivek Oberoi) फसवणूक झाली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1.55 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आरोपींनी अभिनेत्याला एका कार्यक्रमात पैसे गुंतवायला लावले आणि स्वत:च्या फायद्यासाठी त्या पैशांचा वापर केला, असा आरोप अभिनेत्याने केला आहे.
नेमकं प्रकरण काय? (Vivek Oberoi Case)
विवेक ओबेरॉय आणि त्यांची पत्नी प्रियांकाची 1.55 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. एंटरटेनमेंट कंपनी आणि एका चित्रपटाच्या निर्मितीसाठी ओबेराय यांना आरोपींनी 1.55 कोटी रुपये गुंतवण्यास सांगितले यातून प्रचंड आर्थिक फायदा होणार असल्याचेही सांगण्यात आले. मात्र चित्रपट निर्मिती न करता ती सर्व रक्कम आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरली. म्हणून विवेक ओबेराय यांनी मुंबईतील एमआयडीसी पोलीस ठाण्यात यासंदर्भात फसवणुकीची तक्रार दिली आहे.
View this post on Instagram
पोलिसांनी याप्रकरणी कलम 34, 409, 419 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सिने-निर्माते संजय शहा, त्यांची आई नंदिता शाह, राधिका नंदा या आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपांच्या आधारे एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
विवेक ओबेरॉय आणि आरोपी यांना सिने-निर्मिती संबंधित एक कंपनी सुरू करायची होती. विवेकने याआधी 2017 मध्ये 'ओबेरॉय ऑरगॅनिक्स नावाची कंपनी सुरू केली होती. पण या कंपनीच्या माध्यमातून नफा मिळत नसल्याने त्यांनी तीन आरोपींना फर्ममध्ये भागीदार म्हणून आणण्याचा निर्णय घेतला. पण भागीदारांनी फसवल्याचं लक्षात आल्यानंतर लगेचच त्यांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
विवेक ओबेरॉयबद्दल जाणून घ्या... (Who Is Vivek Oberoi)
विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) हा बॉलिवूड अभिनेते सुरेश ओबेरॉय (Suresh Oberoi) यांचा मुलगा आहे. विवेकने 2002 मध्ये 'कंपनी' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. त्याचा पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरला. व्यावसायिक आयुष्यापेक्षा विवेक त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. त्याच्या आगामी सिनेमांची (Vivek Oberoi Upcoming Movies) चाहत्यांना उत्सुकता आहे. लवकरच त्याचे आगामी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
संबंधित बातम्या