एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
दिल्लीत 21, तर मुंबईत 26 तारखेला 'विरानुष्का'च्या लग्नाचं रिसेप्शन
लग्नाचा कार्यक्रम हा अत्यंत खाजगी पद्धतीने करण्यात आला असला तरी भारतात रिसेप्शनचा मोठा कार्यक्रम होणार आहे.
![दिल्लीत 21, तर मुंबईत 26 तारखेला 'विरानुष्का'च्या लग्नाचं रिसेप्शन virat anushka marriage reception in Mumbai and Delhi दिल्लीत 21, तर मुंबईत 26 तारखेला 'विरानुष्का'च्या लग्नाचं रिसेप्शन](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/12/11215756/reception-card.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
रोम : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. इटलीमध्ये हा विवाह सोहळा होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. अखेर इटलीमधीलच एका रिसॉर्टमध्येच हा सोहळा झाला.
लग्नाचा कार्यक्रम हा अत्यंत खाजगी पद्धतीने करण्यात आला असला तरी भारतात रिसेप्शनचा मोठा कार्यक्रम होणार आहे. 21 तारखेला दिल्लीत, तर 26 तारखेला मुंबईत जंगी रिसेप्शन होणार आहे. ज्यामध्ये बॉलिवूडमधील आणि क्रिकेटमधील दिग्गज हजर असतील.
इटलीमध्ये झालेल्या या लग्नसोहळ्याला विराट आणि अनुष्काच्या कुटुंबीयांसह काही निवडक लोकच उपस्थित होते. आता भारतात परतल्यानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा जंगी रिसेप्शन ठेवणार आहेत. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिकाही व्हायरल झाली आहे.
या कार्यक्रमानंतर विराट कोहली नव्या वर्षात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. पाच जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. तर अनुष्काही शुटिंगला सुरुवात करणार आहे.
संबंधित बातम्या :
विराट-अनुष्काच्या लग्नाचा पहिला फोटो!
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
राजकारण
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)