एक्स्प्लोर

Don 3 : इंडस्ट्री सोडण्याच्या तयारी असलेल्या विक्रांत मेस्सीची डॉन 3 मध्ये एन्ट्री, रणवीर सिंहला भिडणार

Don 3 : डॉन 3 विक्रांत मेस्सी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. रणवीर सिंह या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Don 3 Latest Update : बॉलिवूडमध्ये एकीकडे नेपोटिझमचा बोलबाला चालत असताना काही कलाकार असे आहे, जे त्यांच्या कौशल्याच्या बळावर इंडस्ट्रीमध्ये तग धरुन उभे आहेत, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अशाच कलाकारांमधील एक टॅलेंटेड व्यक्ती म्हणजे अभिनेता विक्रांत मेस्सी. 12 वी फेल, द साबरमती रिपोर्ट चित्रपटांमध्ये विक्रांतने त्याचं अभिनय कौशल्य दाखवून दिलं आहे. यासाठी त्याला वेळोवेळी प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळाली. आता विक्रांत मेस्सीची वर्णी फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात मोठ्या फ्रेंचायझीच्या चित्रपटात लागली आहे. डॉन 3 चित्रपटात आता विक्रात मेस्सी खलनायकाच्या रुपात दिसणार आहे.

विक्रांत मेस्सीची डॉन 3 मध्ये एन्ट्री

काही दिवसांपूर्वी फिल्म इंडस्ट्रीतून सोडणार असं वक्तव्य करणारा विक्रात मेस्सी आता डॉन फ्रेंचायझीच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. डॉन 3 चित्रपटात आता विक्रांत मेस्सीची एन्ट्री झाली आहे. डॉन 3 मध्ये विक्रांत व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं की, फरहान अख्तरच्या डॉन 3 चित्रपटात विक्रांत मेस्सीची वर्णी लागू शकते. आता या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे. विक्रांत मेस्सी डॉन 3 मध्ये खलनायकाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

विक्रांत मेस्सी रणवीर सिंहला भिडणार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'डॉन 3' मध्ये अभिनेता रणवीर सिंह याच्याविरोधात अभिनेता विक्रांत मेस्सी झळकणार आहे. या चित्रपटात विक्रांत मेस्सी एका शक्तिशाली आणि धोकादायक खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. विक्रांतचं पात्र रणवीर सिंहच्या 'डॉन' पात्राला कठोर आव्हान देईल. डॉन 3 मध्ये विक्रांत मेस्सीची वर्णी लागल्याची अधिकृत घोषणा निर्माते लवकरच करू शकतात. ही बातमी समोर आल्यानंतर, यानंतर विक्रांतचे चाहते खूप उत्सुक आहेत. त्याला नवीन भूमिकेत पाहण्यासाठी चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

शाहरुख खानच्या जागी रणवीर सिंह

'डॉन 3' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी फरहान अख्तरच्या खांद्यावर आहे, यापूर्वी त्याने 'डॉन' फ्रँचायझीचे दोन्ही चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. डॉन ही बॉलिवूडची सुपरहिट  फ्रेंचायझी आहे, त्यामुळे डॉन 3 चित्रपटाकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. शाहरुख खाननंतर आता रणवीर सिंह ही डॉनची भूमिका साकारत फ्रेंचायझी पुढे नेत आहे. या चित्रपटात रणवीरसोबत कियारा अडवाणीची भूमिकेत दिसणार आहे. कियारा पहिल्यांदाच या मोठ्या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लवकरच डॉन 3  चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्यात येणार आहेत आणि रणवीरचा फर्स्ट लूकही समोर आला आहे.

'12वी फेल' चित्रपटातून खरी ओळख मिळाली

अभिनेता विक्रांत मेस्सीने अलीकडेच 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटात झळकला होता. या चित्रपटातील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं. '12वी फेल' चित्रपटातून त्याला खरी ओळख मिळाली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटात त्याने बिहारमधील एका गरीब मुलाची संघर्षकथा अतिशय प्रभावीपणे मांडली आहे. याशिवाय, त्याने 'सेक्टर 36' मालिकेतही आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Rakhi Sawant : 'ड्रामा क्वीन' राखी सावंत तिसऱ्यांदा लग्न करणार, पाकिस्तानी अभिनेत्यासोबत बांधणार लग्नगाठ; पाकिस्तानात पार पडणार शाही विवाहसोहळा

महत्त्वाच्या बातम्या

Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
Maharashtrachi Hasya Jatra 8 Years: हसवता हसवता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 8 वर्षे पूर्ण; सेटवर रंगला खास सेलिब्रेशन, PHOTOs
हसवता हसवता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 8 वर्षे पूर्ण; सेटवर रंगला खास सेलिब्रेशन, PHOTOs
Kartik Aaryan Injured: भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी
भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी
Awarapan 2 Box Office Collection: 'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
Embed widget