एक्स्प्लोर

Veer Murarbaji Movie : 'वीर मुरारबाजी' 14 फेब्रुवारीला रुपेरी पडद्यावर, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार 'हा' अभिनेता

Veer Murarbaji Purandar Ki Yuddhagatha Release Date : वीर मुरारबाजी चित्रपट 14 फेब्रुवारीला हिंदी, मराठी भाषेत प्रदर्शित होणार आहे. शिवरायांच्या मावळ्यांचा पराक्रमी इतिहास रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक शूर मावळ्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी आणि रयतेच्या राजासाठी स्वत:च्या जीवाची बाजी लावत इतिहास घडवला. शिवकाळातील नररत्नांपैकी एक, रणझुंजार मुरारबाजी देशपांडे. पुरंदरच्या वेढ्याप्रसंगी झालेल्या धुमश्चक्रीत महान पराक्रम गाजवून शेकडो गनिमांना यमसदनी धाडणाऱ्या स्वामीनिष्ठ मुरारबाजी देशपांडे यांचा पराक्रमी इतिहास आजही प्रत्येकाला  प्रेरणा देणारा आहे. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदरचे ‘काळभैरव’ म्हणून ओळख असणारे मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. 14 फेब्रुवारी 2025 ला ‘वीर मुरारबाजी... पुरंदर की युद्धगाथा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. वीर मुरारबाजी चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.  

‘वीर मुरारबाजी... पुरंदर की युद्धगाथा’

छोट्या पडद्यावर ‘श्रीकृष्ण’ आणि ‘महादेव’ या भूमिका साकारत प्रचंड लोकप्रियता मिळवणारा अभिनेता सौरभ राज जैन या चित्रपटात छत्रपती  शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. सौरभने 'ओम नमो व्यंकटेशाय' या दाक्षिणात्य  चित्रपटात 'तिरुपती  बालाजी' ही भूमिकाही उत्तमरित्या साकारली होती. वीर मुरारबाजी चित्रपटातील छत्रपती शिवरायांच्या भूमिकेचं विलोभनीय पोस्टर प्रदर्शित करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची  तारीख  जाहीर करण्यात आली आहे. 'फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आलमंड्स क्रिएशन्स आणि ए.ए.फिल्म्स यांनी ‘वीर मुरारबाजी...पुरंदर की युद्धगाथा’ चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांनी केली आहे. 

रणझुंजार मुरारबाजी देशपांडेंची कथा रुपेरी पडद्यावर

‘छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पडद्यावर साकारण्याची संधी मिळणे, माझ्यासाठी अभिमानास्पद आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेता सौरभ जैननं दिली आहे. त्याने पुढे म्हटलं की, सगळ्या देवतांच्या भूमिका तसेच आपलं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करायला मिळणे, हे मी भाग्यचं समजतो. माझ्या आजवरच्या पौराणिक भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. आपलं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मी साकारत असलेल्या भूमिकेला ही  प्रेक्षकांचं  हेच प्रेम मिळेल, अशी आशा सौरभ राज जैन यांनी व्यक्त  केली. 

View this post on Instagram
 
A post shared by Almondss Creationss (@almondscreations)

तरुणांपर्यंत स्वराज्याचा प्रेरणादायी इतिहास पोहचवण्याचा प्रयत्न

1665 च्या आषाढ महिन्यात मिर्झाराजे जयसिंग आणि सरदार दिलेरखान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला होता. त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार मुरारबाजी देशपांडे निवडक 700 मावळ्यांसह दिलेरखानाच्या फौजेवर चालून गेले आणि ‘न भूतो न भविष्यती’ असा पराक्रम केला. पुरंदरच्या लढाईतल्या पराक्रमाने मुघलांना भयभीत करुन सोडणाऱ्या मुरारबाजी देशपांडे यांची ही यशोगाथा आजच्या पिढीला चित्रपटाच्या माध्यमातून समजावी यासाठी ‘वीर मुरारबाजी... पुरंदर की युद्धगाथा’ हा चित्रपट आम्ही घेऊन येत असल्याचे निर्माते अजय आरेकर यांनी सांगितलं आहे. अधिकाधिक तरुणांपर्यंत स्वराज्याचा प्रेरणादायी इतिहास पोहचवायचा आहे,  त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Kangana Ranaut Office : पालिकेनं कारवाई केलेला बंगला विकून कंगना रणौतने खरेदी केलं महागडं ऑफिस, कोट्यवधींची डील

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Embed widget