एक्स्प्लोर
वरुण-नताशा लवकरच लग्नाच्या बेडीत?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. बालपणीची मैत्रीण नताशा दलालसोबत वरुण सध्या डेटवर आहे. नताशा इंटिरिअर डिझायनर असून, दोघांनीही आपल्या प्रेमाची कबुली दिली नसली, तरी त्यांनी आपल्या प्रेमाला नकारही दिलेला नाही. त्यामुळे चर्चांना आणखी उधाण आलं आहे.
याआधीही वरुण बऱ्याचदा नताशासोबत डिनर डेटवर दिसला होता. मात्र, वरुणने नताशासोबतच्या चर्चांवर स्पष्टीकरण देताना म्हटलं की, या साऱ्या अफवा आहेत. शिवाय, आम्हाला लग्न करायचे की नाही, हा निर्णय आताच घेणे घाईचे ठरेल, असेही वरुण म्हणाला.
'ढिशूम' सिनेमाच्या सक्सेस पार्टीमध्ये नताशा दिसली होती. 'बॉलिवूड हंगामा'च्या वृत्तानुसार, नताशा धवन कुटुंबींयांसोबत बऱ्याचदा दिसून आली आहे. तसंच धवन कुटुंबाचीही इच्छा आहे की, वरूण-नताशाचं लवकर लग्न व्हावं.
नताशाचं कुटुंब जून्या विचारांचे असल्याने वरूणचं नाव कुणा दुसऱ्या अभिनेत्रीसोबत जोडलं जाण्यापूर्वी लग्न व्हावं अशी धवन परिवाराची इच्छा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
