एक्स्प्लोर
वरुणने 'टन टना टन'मधून गोविंदाचं नाव हटवलं
एका मुलाखतीदरम्यान वरुणची आपल्याशी तुलना केल्याने गोविंदा भडकला होता. आपल्याशी वरुणची तुलना करणं हे गोविंदाला अजिबातच आवडत नाही.
मुंबई : अभिनेता वरुण धवन आणि गोविंदा यांच्यातील मतभेद वाढतच आहेत. आता वरुण धवनने 'जुडवा-2' सिनेमाच्या 'टन टना टन' गाण्यातून गोविंदाचं नाव हटवलं आहे.
खरंतर गोविंदा आणि वरुणमध्ये मतभेद असतील, यावर अनेकांना विश्वास बसणार नाही. कारण वरुण डेव्हिड धवन यांचा मुलगा आहे. तर डेव्हिड-गोविंदा ही बॉलिवूडची लोकप्रिय जोडी आहे. पण मागील काही दिवसांपासून वरुण आणि गोविंदामध्ये आलबेल नाही हे नक्की आहे.
भांडणाचं कारण काय?
एका मुलाखतीदरम्यान वरुणची आपल्याशी तुलना केल्याने गोविंदा भडकला होता. आपल्याशी वरुणची तुलना करणं हे गोविंदाला अजिबातच आवडत नाही.
वरुण धवनच्या कॉमिक टायमिंग, अंदाज आणि डान्स मूव्ह पाहून सुरुवातीपासूनच त्याला नवा गोविंदा म्हटलं जात आहे. पण तुलनेवर गोविंदा भडकल्यानंतर साहजिकच वरुणने कोणतंही उत्तर दिलं नाही. पण असं वाटतंय की तो ही गोष्ट विसरलेला नाही.
गाण्यातून गोविंदाचं नाव गायब
काही दिवसांपूर्वी वरुण धवनच्या आगामी 'जुडवा-2' सिनेमातील 'टन टना टन' हे गाणं रिलीज झालं होतं. हे गाणं 90 च्या दशकातील प्रसिद्ध गाणं 'टन टना टन'चं रिमेक व्हर्जन आहे. मूळ गाण्यात गोविंदाशी संबंधित एक ओळ आहे, जी वरुण धवनच्या रिमेक व्हर्जनमधून काढलं आहे.
मूळ गाण्यात 'गोविंदा है हीरो और माधुरी हीरोइन' ही ओळ आहे. पण रिमेकमध्ये ही ओळ न वापरल्याने असंच वाटतंय की वरुणने अशाप्रकारे आपला राग व्यक्त केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement