(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mary Millben: 'बेस्ट लीडर' म्हणत गायिकेनं केलं नरेंद्र मोदींचं कौतुक; म्हणाली, "ते मे महिन्यात पुन्हा जिंकतील"
Mary Millben: "नरेंद्र मोदी यांनी पुन्हा पंतप्रधान व्हावे असे अमेरिकेतील अनेकांना वाटते, जेणेकरून दोन्ही देशांमधील संबंध अधिक चांगल्या पातळीवर बळकट करता येतील. नरेंद्र मोदी हे मे महिन्यात पुन्हा जिंकतील." असंही मेरी मिलबेन म्हणाली.
Mary Millben: सुप्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री मेरी मिलबेननं (Mary Millben) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे मनापासून कौतुक केले. मोदी हे भारतासाठी 'बेस्ट लीडर' आहेत', असं मेरी म्हणाली. तिनं पुढे सांगितलं, नरेंद्र मोदी यांनी पुन्हा पंतप्रधान व्हावे असे अमेरिकेतील अनेकांना वाटते, जेणेकरून दोन्ही देशांमधील संबंध अधिक चांगल्या पातळीवर बळकट करता येतील. नरेंद्र मोदी हे मे महिन्यात पुन्हा जिंकतील.'
मेरी मिलबेन म्हणते, "नरेंद्र मोदी आहेत बेस्ट लीडर"
एका मुलाखतीमध्ये मेरी मिलबेन म्हणाली, "मी सांगू इच्छिते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेत मोठा पाठिंबा आहे. माझा विश्वास आहे की, अनेकांना त्यांना पुन्हा विजयी होताना पाहायचे आहे, कारण ते भारतासाठी बेस्ट लीडर आहेत."
मोदींच्या प्रयत्नांमुळेच महिला नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले: मेरी मिलबेन
मेरी पुढे म्हणाली की, "भारत-अमेरिका संबंधांसाठी पंतप्रधान मोदी हे सर्वोत्तम नेते आहेत. पंतप्रधान मोदींनी भारताला केवळ त्यांच्या प्रदेशातच नव्हे तर जागतिक अर्थव्यवस्थेतही एक मजबूत देश बनवण्यासाठी मोठी पावले उचलली आहेत. तंत्रज्ञानाच्या विकासासाठी त्यांच्या योजनांमुळे महिलांना नेतृत्वात नक्कीच प्रोत्साहन मिळाले आहे. राष्ट्रपती (द्रौपदी मुर्मू) यांना राष्ट्रपती बनवण्यातही त्यांनी अनेक प्रकारे योगदान दिले आहे आणि त्यांच्या प्रयत्नांमुळेच अधिकाधिक महिला नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे."
मेरीने व्यापार आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. यापूर्वी मेरीने आफ्रिकन युनियनला G20 चे पूर्ण सदस्य बनवण्याच्या पंतप्रधानांच्या प्रस्तावाचेही कौतुक केले होते.
View this post on Instagram
भारतात 2024 मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. तर या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत ज्यामध्ये मेरी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देत आहेत.
जाणून घ्या मेरी मिलबेनबद्दल
मेरी मिलबेन ही आफ्रिकन-अमेरिकन वंशाची प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री आहे. भारतातही मेरी मिलबेनचा चाहता वर्ग मोठा आहे. मेरीनं 'जन गण मन'हे भारतीय राष्ट्रगीत मेरीनं गायले त्याचा व्हिडीओ तिनं सोशल मीडियावर शेअर केला होता. मेरी ही सोशल मीडियावर तिच्या गाण्यांचे व्हिडीओ शेअर करत असते. तिला इन्स्टाग्रामवर 11.1K फॉलोवर्स आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
देशात पुन्हा मोदी येणार, राज्यातही पुन्हा डबल इंजिन सरकार बनणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे