एक्स्प्लोर

Urvashi Rautela : अभिनेत्री उर्वशी रौतेला रुग्णालयात भरती, शूटींगवेळी ॲक्शन सीनदरम्यान फ्रॅक्चर

Urvashi Rautela NBK 109 Movie Shoot : अभिनेत्री उर्वशी रौतेला दुखापती झाली असून तिला रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. NBK 109 च्या ॲक्शन सीनदरम्यान फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे.

Urvashi Rautela Hospitalised : अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) नेहमीच चर्चेत असते. उर्वशीच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफबद्दल जाणून घेण्यास चाहते नेहमीच उत्सुक असतात. आता उर्वशी रौतेलाच्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. उर्वशी रौतेला हिला रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. चित्रपटाच्या शूटींगदरम्यान उर्वशीला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. उर्वशीला हैदराबादमध्ये शूटींगदरम्यान गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अभिनेत्री उर्वशी रौतेला रुग्णालयात भरती

उर्वशी रौतेला ही हैदराबादमध्ये चित्रीकरणादरम्यान जखमी झाली आहे. हैदराबादमध्ये चित्रपटाच्या शूटींगदरम्यान फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर येत आहे. अभिनेत्री उर्वशी रौतेला साऊथचे दिग्गज सुपरस्टार नंदमुरी बालकृष्ण यांच्या 'एनबीके 109' या तेलुगु चित्रपटात झळकणार आहे. 'एनबीके 109' चित्रपटाच्या शूटींगवेळी उर्वशीला दुखापत झाल्याचं समोर आलं आहे.

शूटींगवेळी ॲक्शन सीन करताना फ्रॅक्चर

मीडिया रिपोर्टनुसार, हैदराबादमध्ये चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाल्याने उर्वशीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर उर्वशीच्या टीमने जारी केलेल्या प्रेस स्टेटमेंटमध्ये तिला गंभीर फ्रॅक्चर झाल्याचं सांगण्यात आलं आहे. सध्या तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, तिथे त्याच्यावर उपचार केले जात आहेत. हाय-ऑक्टेन सीन शूट करताना तिला फ्रॅक्चर झालं आणि तेव्हापासून तिला वेदना होत आहेत, असंही उर्वशीच्या टीमने सांगितलं आहे.

View this post on Instagram
 
A post shared by URVASHI RAUTELA (@urvashirautela)

'एनबीके 109'मध्ये बॉबी देओलही मुख्य भूमिकेत

उर्वशी रौतेला दिग्गज दक्षिणात्या अभिनेते बालकृष्ण यांच्या 'एनबीके 109' या तेलगु चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात अभिनेता बॉबी देओल हा देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचं तिसऱ्या शेड्युलमधील चित्रीकरण हैदराबादमध्ये सुरु असल्याची माहिती आहे. बॉबी कोळी दिग्दर्शित या चित्रपटाला थमन एस यांनी संगीत दिलं आहे. 'एनबीके 109' हा चित्रपट नोव्हेंबर 2024 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र निर्मात्यांनी अद्याप हा चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केलेली नाही.

 महत्त्वाच्या इतर बातम्या :

5000 रुपयांपासून सुरुवात ते 2.25 लाख रुपये दिवसाची कमाई; इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रीची स्ट्रगल स्टोरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  AM :  17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी, परिवर्तनाच्या प्रवासाची सुरुवात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget