एक्स्प्लोर

5000 रुपयांपासून सुरुवात ते 2.25 लाख रुपये दिवसाची कमाई; इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रीची स्ट्रगल स्टोरी

Shweta Tiwari : श्वेता तिवारीला 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या कसौटी जिंदगी की टीव्ही मालिकेने लोकप्रियता मिळवून दिली. यानंतरही ती अनेक मालिकांमध्ये झळकली आहे.

मुंबई : अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) सध्या सिंघम अगेन (Singham Again) चित्रपटामुळे चर्चेत आहे. रोहित शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शित सिंघम अगेन चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. श्वेता तिवारीने इथंपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. छोट्या पडद्यापासून आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल तिने सांगितलं. श्वेताने टीव्ही इंटस्ट्रीतील जुने दिवस कसे होते, ते सांगितलं आहे. तिने सुरुवातीच्या दिवसांमध्ये 5000 रुपयांमध्ये काम केल्याचं सांगितलं.

5000 रुपयांपासून सुरुवात ते 2.25 लाख रुपये दिवसाची कमाई

श्वेता तिवारी ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून घराघरात पोहोचली. श्वेता तिवारीने सांगितलं की, तिने ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेची सुरुवात प्रतिदिन 5000 रुपये पगारातून केली होती. दरवर्षी, आम्हाला इन्क्रीमेंट मिळायची. त्यानंतर मी जेव्हा शो सोडला तोपर्यंत मला दररोज 2.25 लाख मानधन मिळत होते.

निर्माते कलाकारांना जास्त पैसे देण्यास तयार नसतात

श्वेताने सांगितलं की, अनेक वेळा निर्माते कलाकारांना जास्त पैसे देण्यास तयार नसतात आणि म्हणूनच अनुभवी कलाकारांना काम मिळवण्यासाठी अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतं. कमी पगारामुळे तिने आता प्रोजेक्ट नाकारायला सुरुवात केली आहे. याशिवाय, नवीन कलाकार खूप कमी बजेटमध्ये काम स्वीकारतात. त्यामुळेही काम मिळणं, कठीण बनलं आहे, असंही तिने म्हटलं आहे.

प्रेरणाच्या भूमिकेसाठी श्वेता तिवारीची निवड कशी झाली?

एकता कपूरने भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय शोमध्ये श्वेता तिवारी आणि सेझन खान यांना कास्ट करण्याचा निर्णय कसा घेतला हे एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं. तेव्हा एकता कपूर म्हणाली, 'मी श्वेताला दूरदर्शनच्या एका शोमध्ये पाहिलं होतं. तेव्हा ती मुख्य भूमिकेतही नव्हती आणि एका सीनमध्ये खूप मागे उभी होती. पण तिच्यात मला काहीतरी खास वाटलं आणि मी माझ्या टीमला तिच्यापर्यंत पोहोचायला सांगितलं. सिझान (Cezanne) आमच्यासाठी आधीच एक शो करत होता आणि मला वाटले की, या दोघांची जोडी चांगली वाटेल.'

View this post on Instagram
 
A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

अनेक मालिकांमध्ये झळकलीय श्वेता तिवारी

श्वेता तिवारीला 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या कसौटी जिंदगी की टीव्ही मालिकेने लोकप्रियता मिळवून दिली. यानंतरही ती अनेक मालिकांमध्ये झळकली आहे. याशिवाय श्वेता तिवारी बिग बॉसचा चौथा सीझन जिंकली. यासोबतच ती नच बलिए, झलक दिखला जा आणि फियर फॅक्टर खतरों के खिलाडीमध्येही दिसली होती. श्वेता रिॲलिटी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध चेहरा आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Singham Again : कॉप युनिवर्समध्ये ग्लॅमरस श्वेता तिवारीची एन्ट्री, या खास भूमिकेत झळकणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Embed widget