एक्स्प्लोर

उर्मिला मातोंडकर उद्या शिवसेनेत प्रवेश करणार!

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उद्या (1 डिसेंबर) दुपारी पत्रकार परिषद घेऊन त्या आपली भूमिका स्पष्ट करतील.

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उर्मिला मातोंडकर उद्या (1 डिसेंबर)  दुपारी बारा वाजता त्या शिवसेनेत सामील होती. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्या आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे विधानपरिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 सदस्यांमध्ये शिवसेनेने आपल्या कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांना आधीच उमेदवारी दिली आहे.

उर्मिला मातोंडकर हे नाव सिनेसृष्टीसह अखिल भारताला कळलं ते 1983 मध्ये. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेल्या उर्मिला यांनी मासूम या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं. हिंदी इंडस्ट्रीत नायिका म्हणून त्यांनी शिरकाव केला तो 1991 मध्ये नरसिंहा या चित्रपटातून. त्यानंतर रंगीला, सत्या, कौन, जंगल, मस्त, जुदाई, प्यार तुने क्या किया अशा अनेक चित्रपटांतून विविध भूमिका साकारून उर्मिला यांनी चतुरस्र अभिनेत्री अशी आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या अभिनय कौशल्याबद्दल त्यांना फिल्मफेअरसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

कालांतराने उर्मिला आपल्या वैवाहिक जीवनात व्यग्र झाल्या. पण मार्च 2019 मध्ये त्या पुन्हा चर्चेत आल्या. त्याला कारणही तसं होतं. उर्मिला मातोंडकर यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कॉंग्रेस पक्षाने त्यांना उत्तर मुंबई मतदारसंघातून खासदारकीचं तिकीट देऊन रिंगणात उतरवलं. ती निवडणूक त्या हरल्या पण त्यांना मिळालेली मतं पाहता आपल्या विचारी आणि विवेकी संवाद कौशल्यातून त्यांनी चांगली लढत दिली. या निवडणुकीनंतर पक्षांतर्गत झालेल्या राजकारणाला कंटाळून त्यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. उर्मिला यांनी अलिकडच्या काळात कंगना रनौतवरही आपल्या चिंतनशील आणि अभ्यासू वृत्तीने पलटवार केला. त्यानंतर राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली. आता त्या अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

संबंधित बातम्या

'ग्लॅमरस' शिवसेना! शिवसेनेत नाराजी, सेनेतले सैनिक गेले कुठे?

महाविकास आघाडीकडून विधानपरिषदेसाठी 'या' 12 जणांना संधी, जाणून घ्या त्यांच्याविषयी

उर्मिला मातोंडकर हातावर शिवबंधन, उर्मिला मातोंडकरांना शिवसेनेच्या कोट्यातून आमदारकी! स्पेशल रिपोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : सलमान खानला पनवेलच्या फार्महाऊसवर मारण्याचा प्लॅन, गार्डसोबत मैत्री; शार्प शुटरचा धक्कादायक खुलासा
मोठी बातमी : सलमान खानला पनवेलच्या फार्महाऊसवर मारण्याचा प्लॅन, गार्डसोबत मैत्री; शार्प शुटरचा धक्कादायक खुलासा
पॅकबंद बॉक्स, कारमध्ये 5 कोटींची कॅश; शिवापूर टोलनाक्यावर सापडलेली गाडी कोणाच्या नावावर?, बड्या नेत्यावर आरोप
पॅकबंद बॉक्स, कारमध्ये 5 कोटींची कॅश; शिवापूर टोलनाक्यावर सापडलेली गाडी कोणाच्या नावावर?, बड्या नेत्यावर आरोप
Sanjay Raut : मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले, 15 कोटीचा पहिला हप्ता! काय बापू, किती हे खोके? संजय राऊतांचा हल्लाबोल
मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले, 15 कोटीचा पहिला हप्ता! काय बापू, किती हे खोके? संजय राऊतांचा हल्लाबोल
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वरळीत आदित्य ठाकरेंना हरवण्यासाठी शिंदे-फडणवीसांची खास रणनीती, मध्यरात्री राज ठाकरेंना भेटले
वरळीत आदित्य ठाकरेंना हरवण्यासाठी शिंदे-फडणवीसांची खास रणनीती, मध्यरात्री राज ठाकरेंना भेटले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Khed 5 Cr Cash Seized| खेड शिवापूर टोलनाक्यावर 5 कोटींची कॅश जप्त, अधिकाऱ्यांची आळीमिळी गुपचिळीPune Congress : पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटावरून वादावादीPune : बड्या नेत्याच्या कारमध्ये 5 कोटींची रोख रक्कम; खेड शिवापूर टोलनाक्यावर कारवाईTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 22 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : सलमान खानला पनवेलच्या फार्महाऊसवर मारण्याचा प्लॅन, गार्डसोबत मैत्री; शार्प शुटरचा धक्कादायक खुलासा
मोठी बातमी : सलमान खानला पनवेलच्या फार्महाऊसवर मारण्याचा प्लॅन, गार्डसोबत मैत्री; शार्प शुटरचा धक्कादायक खुलासा
पॅकबंद बॉक्स, कारमध्ये 5 कोटींची कॅश; शिवापूर टोलनाक्यावर सापडलेली गाडी कोणाच्या नावावर?, बड्या नेत्यावर आरोप
पॅकबंद बॉक्स, कारमध्ये 5 कोटींची कॅश; शिवापूर टोलनाक्यावर सापडलेली गाडी कोणाच्या नावावर?, बड्या नेत्यावर आरोप
Sanjay Raut : मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले, 15 कोटीचा पहिला हप्ता! काय बापू, किती हे खोके? संजय राऊतांचा हल्लाबोल
मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले, 15 कोटीचा पहिला हप्ता! काय बापू, किती हे खोके? संजय राऊतांचा हल्लाबोल
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वरळीत आदित्य ठाकरेंना हरवण्यासाठी शिंदे-फडणवीसांची खास रणनीती, मध्यरात्री राज ठाकरेंना भेटले
वरळीत आदित्य ठाकरेंना हरवण्यासाठी शिंदे-फडणवीसांची खास रणनीती, मध्यरात्री राज ठाकरेंना भेटले
Entertainment: घटस्फोटाच्या चर्चांना ब्रेक! निम्रत कौरसमोर अभिषेकनं केलं ऐश्वर्याचं कौतुक, म्हणाला 'ती माझ्यासाठी कायमच भावनिक आधार'
घटस्फोटाच्या चर्चांना ब्रेक! निम्रत कौरसमोर अभिषेकनं केलं ऐश्वर्याचं कौतुक, म्हणाला 'ती माझ्यासाठी कायमच भावनिक आधार
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रात फक्त गुलाबी वादळ घोंघावणार, राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे जोमानं फिरणार..! दादांकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर
महाराष्ट्रात फक्त गुलाबी वादळ घोंघावणार, राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे जोमानं फिरणार..! अजितदादांकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर
'या' जन्मतारखेचे लोक असतात खूप भाग्यवान, धैर्यवान; तुमचा मूलांक आहे का यात?
'या' जन्मतारखेचे लोक असतात खूप भाग्यवान, धैर्यवान; तुमचा मूलांक आहे का यात?
Kolhapur Uttar Vidhan Sabha : खासदार धनंजय महाडिकांच्या मुंबईत भेटीगाठी सुरु असतानाच कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागरांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त ठरला!
खासदार धनंजय महाडिकांच्या मुंबईत भेटीगाठी सुरु असतानाच कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागरांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त ठरला!
Embed widget