Urfi Javed : अखेर उर्फी जावेदला स्थळ आलं, तिच्यासारख्याच अवलियाकडून लग्नाची मागणी, उर्फी म्हणाली, "Love You Too"
Urfi Javed : 'बिग बॉस' (Bigg Boss) फेम पुनीत सुपरस्टारने (Puneet Superstar) उर्फी जावेदला लग्नाची मागणी घातली आहे.
Urfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. उर्फीसोबत संसार थाटण्याची अनेकांची इच्छा असते. 'बिग बॉस' (Bigg Boss) फेम पुनीत सुपरस्टारने (Puneet Superstar) उर्फीला चक्क लग्नाची मागणी घातली आहे. लग्न करण्यासाठी त्याने उर्फीला हात जोडत विनंती केली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
'बिग बॉस'मध्ये पुनीत सुपरस्टारने गोंधळ घातला होता. याच कारणाने त्याला या कार्यक्रमातून बाहेर काढण्यात आलं. अशातच त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सध्या तो चर्चेत आहे. पुनीतने उर्फीला लग्नाची मागणी (Puneet Superstar Propose Urfi Javed For Wedding) घातली आहे. पुनीत उर्फीला लग्न करण्यासाठी हात जोडत विनंती करत आहे.
पुनीत सुपरस्टारचा व्हिडीओ व्हायरल (Punnet Superstar Video Viral)
पुनीत सुपरस्टारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीमध्ये तो उर्फीला म्हणत आहे की,"उर्फी जावेद यार, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या मनातली एक गोष्ट मला तुला सांगायची आहे. पण कसं सांगावं हे कळत नाही. उर्फी मला तुझ्यासारखी मुलगी जोडीदार म्हणून हवी आहे. मी हात जोडून तुला विनंती करतो कृपया माझ्यासोबत लग्न कर".
View this post on Instagram
उर्फी जावेद पुनीत सुपरस्टारला म्हणाली,"Love You Too"
पुनीत सुपरस्टारचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उर्फी जावेदनेही (Urfi Javed Reaction on Puneet Superstar Propose) आपली प्रतिक्रिया दिली आहे. पापराझींसोबत बोलताना उर्फी म्हणाली की,"पुनीतसोबत लग्न करणार नाही. पण लव्ह यू टू". उर्फी आणि पुनीतच्या वेडेपणावर नेटकरी हसत आहेत. चांगल्या व्हिडीओ कंटेटसाठीचा हा स्टंट असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.
उर्फी जावेद तिच्या अतरंगी ड्रेसिंगमुळे नेहमीच चर्चेत असते. तर दुसरीकडे पुनीत सुपरस्टार वादग्रस्त वक्तव्यामुळे नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असतो. त्याच्या याच गोष्टीमुळे 'बिग बॉस'च्या घरातून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. पुनीत हा लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुयंसर आणि युट्यूबर आहे.
संबंधित बातम्या