एक्स्प्लोर
Raigad Politics: गोगावलेंच्या नव्या फॉर्म्युल्यावर तटकरेंची खिल्ली, रायगडमध्ये महायुतीत बिघाडी?
कोकणातील राजकारणात (Konkan Politics) मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे (Shiv Sena) नेते भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्यातील वाद आता जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावरून विकोपाला गेला आहे. 'जागावाटपाचं नवीन असं एक अगाध ज्ञान मला ऐकायला मिळालं, त्याच्यामुळे मी एकदम स्तब्ध झालेला आहे, असल्यामुळे मी भांबावून गेलेलो आहे', अशा शब्दांत सुनील तटकरेंनी भरत गोगावलेंच्या फॉर्म्युल्याची खिल्ली उडवली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी गोगावले यांनी प्रत्येक आमदाराला ८ जागा वाटप करण्याचे सूत्र मांडले होते, ज्यावर तटकरेंनी जोरदार टीका केली. याचदरम्यान, गोगावले यांचे पुत्र विकास यांच्या जवळचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे सुशांत जावरे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या सर्व घडामोडींमुळे रायगडमधील महायुतीमधील मतभेद स्पष्टपणे समोर आले आहेत.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















