(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Upcoming Movies : 'तमाशा लाईव्ह' ते 'शाबास मिथू'; शुक्रवारी सिनेमागृहात प्रदर्शित होणार पाच बिग बजेट सिनेमे
Upcoming Movies This Week : येत्या शुक्रवारी अनेक बिग बजेट सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
Movies List Releasing This Friday : सिनेरसिक नेहमीच शुक्रवारची आतुरतेने वाट पाहत असतात. येत्या शुक्रवारी अनेक बिग बजेट सिनेमे (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे येत्या शुक्रवारी अनेक बिग बजेट सिनेमांची टक्कर होणार आहे. यात प्रेक्षकांना थरार, नाट्य, बायोपिक, अॅक्शन, भयपट अशा अनेक प्रकारचे सिनेमे पाहायला मिळणार आहेत.
'शाबास मिथू' (Shabaash Mithu) : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) गेल्या अनेक दिवसांपासून 'शाबास मिथू' (Shabaash Mithu) या सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा भारतीय क्रिकेटर मिताली राजच्या आयुष्यावर आधारित आहे. या बायोपिकसाठी मितालीने प्रचंड मेहनत घेतली आहे. हा सिनेमा येत्या शुक्रवारी म्हणजेच 15 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची क्रिडाप्रेमींमध्ये चांगलीच क्रेझ आहे.
हिट: द फर्स्ट केस (Hit:The First Case) : 'हिट: द फर्स्ट केस' या सिनेमात प्रेक्षकांना थरार नाट्य अनुभवायला मिळणार आहे. या सिनेमात राजकुमार राव (Rajkumar Rao) मुख्य भूमिकेत आहे. 'हिट' या तामिळ सिनेमाचा 'हिट: द फर्स्ट केस' हा हिंदी रिमेक आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा 15 जुलैला प्रदर्शित होत आहे.
तमाशा लाईव्ह (Tamasha Live) : 'तमाशा लाईव्ह' (Tamasha Live) हा भव्यदिव्य सिनेमा 15 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे, यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
लडकी: एंटर द गर्ल ड्रॅगन (Ladki : Enter The Girl Dragon) : लडकी: एंटर द गर्ल ड्रॅगन (Ladki : Enter The Girl Dragon) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा राम गोपाल वर्मा यांनी सांभाळली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून पूजा भालेकर सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. मार्शल आर्ट्सवर आधारित हा सिनेमा आहे. चीनमध्येदेखील हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. भारतीय सिनेप्रेक्षक हा सिनेमा 15 जुलैपासून पाहू शकतात.
जुदा होके भी (Judaa Hoke Bhi) : 'जुदा होके भी' (Judaa Hoke Bhi) हा विक्रम भट्ट (Vikram Bhatt) यांचा भयपट आहेय या सिनेमात अक्षय ओबरॉय आणि एंद्रिता रे मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमांसह 'द ग्रे मॅन', 'द वारियर', 'गार्गी' आणि 'बाजरे दा सिट्टा' हेसिनेमेदेखील सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहेत.
संबंधित बातम्या