Titeeksha Tawde : तापसीच्या 'शाबास मिथू'मध्ये झळकणार मराठमोळी अभिनेत्री तितिक्षा तावडे; 15 जुलैला सिनेमा होणार प्रदर्शित
Shabaash Mithu : अभिनेत्री तापसी पन्नूचा 'शाबास मिथू' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
![Titeeksha Tawde : तापसीच्या 'शाबास मिथू'मध्ये झळकणार मराठमोळी अभिनेत्री तितिक्षा तावडे; 15 जुलैला सिनेमा होणार प्रदर्शित Marathi actress Titeeksha Tawde to star in Tapasi Shabaash Mithu The movie will be released on July 15 Titeeksha Tawde : तापसीच्या 'शाबास मिथू'मध्ये झळकणार मराठमोळी अभिनेत्री तितिक्षा तावडे; 15 जुलैला सिनेमा होणार प्रदर्शित](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/13/e033b9fb7ce9c12be56d01801ade37c01657715602_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shabaash Mithu : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूचा (Taapsee Pannu) 'शाबास मिथू' (Shabaash Mithu) 'शाबास मिथू' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तापसी भारतीय क्रिकेटर मिताली राजच्या (Mithali Raj) भूमिकेत दिसणार आहे. तर या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री तितिक्षा तावडेदेखील (Titeeksha Tawde) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
'शाबास मिथू' या सिनेमाच्या पोस्टर, टीझर, गाणी, ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. तितिक्षा तावडेनेदेखील या सिनेमाचा टीझर आणि तिला लूक सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. तितिक्षाने शेअर केलेल्या सिनेमातील लूकवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अनेक सेलिब्रिटींनीदेखील कमेंट्स करत तितिक्षाचे कौतुक केले आहे.
View this post on Instagram
'शाबास मिथू' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सृजित मुखर्जी यांनी सांभाळली आहे. तर या सिनेमात तापसी पन्नू व्यतिरिक्त अभिनेते विजय राज, अजित अंधारे, अभिनेत्री प्रिया अवोन आणि मराठमोळी अभिनेत्री तितिक्षा तावडेदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तापसीचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
15 जुलैला 'शाबास मिथू' होणार प्रदर्शित
'शाबास मिथू' हा सिनेमा 15 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजच्या आयुष्यावर भाष्य करणारा आहे. तसेच महिला क्रिकेट संघाच्या आयुष्याभोवती या सिनेमाचे कथानक फिरते. मिताली राजने तिच्या कारकिर्दीत अनेक चढउतारांचा सामना केला, पण तिने कधीही हार मानली नाही. चार विश्वचषकांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करून, तिने स्वत:ला सिद्ध केले आहे. अशा अनेक गोष्टी या सिनेमात पाहायला मिळणार असल्याने प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
संबंधित बातम्या
Shabaash Mithu Trailer : ‘शाबास मिथू’ चा जबरदस्त ट्रेलर रिलीज; क्रिकेटच्या मैदानात तापसी लगावणार चौकार, षटकार
Cricket Match With Taapsee : ‘शाबास मिथू’चा प्रमोशनल फंडा, तापसी अन् मिताली राजसोबत रंगला क्रिकेटचा सामना!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)