एक्स्प्लोर

... तर पद्मावती रिलीज होऊ देणार नाही, यूपीचे उपमुख्यमंत्रीही विरोधात

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही सिनेमाला विरोध दर्शवला आहे.

लखनौ : वादाच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली असली तरी ‘पद्मावती’समोरची संकटं थांबायचं नाव घेत नाहीत. विविध ठिकाणी विरोध सुरु असतानाच आता उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही सिनेमाला विरोध दर्शवला आहे. सिनेमातील आक्षेपार्ह दृष्य हटवले नाही, तर सिनेमा उत्तर प्रदेशात रिलीज होऊ देणार नाही, असा इशारा केशव प्रसाद मौर्य यांनी दिला आहे. त्यामुळे ‘पद्मावती’च्या विरोधाला आता पूर्णपणे राजकीय स्वरुप प्राप्त झालं आहे. दुसरीकडे करनी सेनेचाही विरोध कायम आहे. दरम्यान यापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही हा सिनेमा रिलीज न होऊ देण्याची मागणी केली होती. सिनेमा रिलीज झाला तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं ते म्हणाले होते. प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली ‘पद्मावती’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लांबणीवर पडली आहे. 1 डिसेंबर रोजी रीलिज होणारा हा सिनेमा पुढे ढकलण्यात आला आहे. नवीन रीलिजिंग डेट लवकरच जाहीर केली जाणार आहे. सीबीएफसीकडून अद्याप पद्मावती चित्रपटाला सर्टिफिकेट मिळालेलं नाही. त्यातच या सिनेमाचं मीडिया स्क्रीनिंग केल्यामुळे सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी नाराज होते. रणवीर सिंग, दीपिका पदुकोन आणि शाहीद कपूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘पद्मावती’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. राजपूतांच्या राणीचं चुकीचं चित्रण केल्याचा आरोप करत करणी सेनेने सिनेमाला विरोध केला आहे. पद्मावती कधी प्रदर्शित होणार, याबाबत अद्याप मौन बाळगण्यात आलं आहे. निर्माते व्हायाकॉम 18 यांनी मात्र आपण स्वेच्छेने सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर टाकत असल्याचा दावा प्रसिद्धीपत्रकात केला आहे. सीबीएफसीबद्दल आपल्याला आदर असल्याचं सांगत लवकरच सिनेमाला हिरवा कंदील मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. ‘राजपूतांची परंपरा आणि सन्मान यांचं चित्रण पद्मावतीमध्ये केलं आहे. ही कहाणी पाहून प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानाने भरुन येईल, आम्ही कायद्याचं पालन करणारे जबाबदार नागरिक आहोत. लवकरच सिनेमाला हिरवा कंदील मिळेल. रीलिजिंग डेट लवकरच जाहीर करु’ असं व्हायाकॉमने म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sankarshan Karhade Grandfather: तेव्हा फोन नवीन आलेले, माझ्या फोनवर 17-18 मिस्ड कॉल आलेले, मी आईला फोन केला आणि म्हणालो....: संकर्षण कऱ्हाडे
तेव्हा फोन नवीन आलेले, माझ्या फोनवर 17-18 मिस्ड कॉल आलेले, मी आईला फोन केला आणि म्हणालो....: संकर्षण कऱ्हाडे
Girish Kulkarni on Nana Patekar Deool: 'देऊळ' सिनेमासाठी गिरीश कुलकर्णींना नाना पाटेकरच का हवे होते? सांगितला किस्सा; म्हणाले, 'नानांनी मला 6 महिने तंगवलं'
'देऊळ' सिनेमासाठी गिरीश कुलकर्णींना नाना पाटेकरच का हवे होते? सांगितला किस्सा; म्हणाले, 'नानांनी मला 6 महिने तंगवलं'
Uday Tikekar on Ashok Saraf Laxmikant Berde: 'अशोक मामा अन् लक्ष्मीकांत बेर्डे खूप सतवायचे, फायटिंग सीन करताना चिमटा...'; उदय टिकेकरांनी सांगितला सेटवरचा किस्सा
'अशोक मामा अन् लक्ष्मीकांत बेर्डे खूप सतवायचे, फायटिंग सीन करताना चिमटा...'; उदय टिकेकरांनी सांगितला सेटवरचा किस्सा
Shweta Keswani Supports Shahana Goswami: एकापेक्षा जास्त पुरुषांसोबत नातं असेल, तर त्यात अडचण काय? अभिनेत्रीचं ओपन रिलेशनशिप्सवर बेधडक वक्तव्य, म्हणाली...
एकापेक्षा जास्त पुरुषांसोबत नातं असेल, तर त्यात अडचण काय? अभिनेत्रीचं ओपन रिलेशनशिप्सवर बेधडक वक्तव्य, म्हणाली...

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
Kiren Rijiju vs Naseeruddin Shah : शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
Ambajogai Cataract Surgery : बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Satej Patil: तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
Pune Graduate And Teachers Election Result 2026: पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
Abdul Sattar : युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
Sunetra Pawar: पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
Embed widget