Uorfi Javed: उर्फी जावेदने गुपचूप उरकला साखरपुडा? व्हायरल फोटोमुळे चर्चेला उधाण
Uorfi Javed: उर्फीनं गुपचूप साखरपुडा केला आहे का? असा प्रश्न व्हायरल फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना पडला आहे.
![Uorfi Javed: उर्फी जावेदने गुपचूप उरकला साखरपुडा? व्हायरल फोटोमुळे चर्चेला उधाण Uorfi Javed rumored secretly engaged take a look at the viral photos with the mystery man Uorfi Javed: उर्फी जावेदने गुपचूप उरकला साखरपुडा? व्हायरल फोटोमुळे चर्चेला उधाण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/03/0d130cff4207c4120afecc32f3a1fe261696321893807259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Uorfi Javed: उर्फी जावेद (Uorfi Javed) ही तिच्या अतरंगी फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते. काही लोक उर्फीच्या फॅशनचं कौतुक करतात. तर अनेक जण तिला ट्रोल देखील करतात. सध्या उर्फी ही तिच्या फॅशनमुळे नाही तर एका व्हायरल फोटोमुळे चर्चेत आहे. उर्फीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती एका मिस्ट्री मॅनसोबत पूजा करताना दिसत आहे. उर्फीच्या या व्हायरल फोटोमुळे उर्फीनं गुपचूप साखरपुडा केला आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
उर्फीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल फोटोमध्ये एक व्यक्ती उर्फीसोबत पूजा करताना आहे. या फोटोमध्ये हवन कुंड देखील दिसत आहे.
व्हायरल फोटोमध्ये उर्फी ही निळ्या कलरच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. तर उर्फीसोबत पूजेला बसलेला व्यक्ती हा व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पँट अशा लूकमध्ये दिसत आहे.
View this post on Instagram
उर्फीच्या अतरंगी फॅशनमुळे अनेक लोक तिला ट्रोल करतात. प्लास्टिक, वायर,पिझ्झा आणि काचा यांसारख्या गोष्टींचा वापर करुन तयार करण्यात आलेले आऊटफिट उर्फी परिधान करते. अतरंगी आऊटफिटमधील फोटो उर्फी सोशल मीडियावर शेअर करते. उर्फीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. उर्फीला इन्स्टाग्रामवर 4.2 मिलियन फॉलोवर्स आहेत.
View this post on Instagram
अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरात या क्षेत्रांमध्ये उर्फी काम करते. दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीजन 2 आणि कसौटी जिंदगी की या मालिकांमध्ये उर्फीनं काम केलं आहे. 2015 मधील टेडी-मेडी फॅमिली या मालिकेमधून उर्फीनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सिझनमधून उर्फी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या शोमुळे तिला लोकप्रियता मिळाली.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)