![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Uorfi Javed: 'देशाचं नाव खराब करत आहेस'; उर्फीचा ड्रेस पाहून भडकला व्यक्ती; अभिनेत्रीसोबत एअरपोर्टवर झाली बाचाबाची, व्हिडीओ व्हायरल
नुकताच उर्फीचा (Uorfi Javed) एअरपोर्टवरील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
![Uorfi Javed: 'देशाचं नाव खराब करत आहेस'; उर्फीचा ड्रेस पाहून भडकला व्यक्ती; अभिनेत्रीसोबत एअरपोर्टवर झाली बाचाबाची, व्हिडीओ व्हायरल Uorfi Javed blast over man who commented on her clothes video viral on social media Uorfi Javed: 'देशाचं नाव खराब करत आहेस'; उर्फीचा ड्रेस पाहून भडकला व्यक्ती; अभिनेत्रीसोबत एअरपोर्टवर झाली बाचाबाची, व्हिडीओ व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/25/c7dc00d9de3d734ddea6f4b2ee72ac8b1690269341137259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Uorfi Javed: आपल्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या उर्फी जावेदचा (Uorfi Javed) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी ही एअरपोर्टवर फोटोग्राफर्सला पोज देताना दिसत आहे. अशातच एक व्यक्ती उर्फीला तिच्या ड्रेसवरुन ओरडतो. या व्यक्तीसोबत उर्फीची बाचाबाची होते. उर्फी आणि या व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
उर्फी जावेदचा एअरपोर्टवरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तिने हिरव्या रंगाचा बॅकलेस कॉटन मॅक्सी ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. फोटोग्राफर उर्फीचे फोटो काढत असताना, एक माणूस हातात स्टीलचा घेऊन तिथून जाताना दिसत आहे, तो माणूस उर्फीकडे पाहतो आणि म्हणतो, 'देशाचं नाव खराब करत आहेस' त्यानंतर उर्फी त्या व्यक्तीला म्हणते, 'आपके बाप का कुछ जा रहा है? नहीं जा रहा ना तो जाओ अपना काम करो.' उर्फीची मॅनेजर त्या व्यक्तीला जायला सांगते, असंही या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
उर्फीच्या एअरपोर्टवरील या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहे. काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओला कमेंट करुन त्या व्यक्तीचं कौतुक केलं आहे तर काहींनी उर्फीला ट्रोल केलं आहे.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
उर्फीनं याआधी प्लास्टिक, वायर आणि काचांपासून तयार केलेला ड्रेस परिधान करुन सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. उर्फी ही तिच्या अतरंगी स्टाईलमुळे चर्चेत असते. उर्फीच्या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.
अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये उर्फी काम करते. दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीजन 2 आणि कसौटी जिंदगी की या प्रसिद्ध मालिकांमध्ये उर्फीनं काम केलं आहे. 2015 मधील टेडी-मेडी फॅमिली या मालिकेमधून उर्फीनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सिझनमधून उर्फी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या शोमुळे तिला लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावर फोटोमुळे उर्फी ही चर्चेत असते.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)