एक्स्प्लोर
Advertisement
आधी सैराट, आता उडता पंजाब, सेन्सॉर कॉपी लीक होतेच कशी, रितेशचा सवाल
मुंबईः सैराट या सिनेमाप्रमाणेच उडता पंजाब या सिनेमाला रिलीजच्या अगोरदरच पायरसीचं ग्रहण लागलं आहे. उडता पंजाबची सेन्सॉर कॉपी लिक झाल्यामुळे सिनेमाला मोठा फटका बसला आहे, अगोदर सैराटची सेन्सॉर कॉपी लिक झाली आणि आता उडता पंजाबची, त्यामुळे सेन्सॉर कॉपी लीक कशी होऊ शकते, असा सवाल अभिनेता रितेश देशमुखने केला आहे.
https://twitter.com/Riteishd/status/743161458091929600
उडता पंजाब हा सिनेमा पंजाब राज्यातील ड्रग्जच्या समस्येवर बनवण्यात आला आहे. या सिनेमाचा वाद सुप्रीम कोर्टापर्यंत पोहचलेला असताना आता पायरसीचं ग्रहण लागलं आहे. त्यामुळे सर्वच कलाकारांनी सिनेमा डाऊनलोड न करता थिएटरमध्ये जाऊन पाहण्याची विनंती केली आहे.
आलीयाची कळकळीची विनंती
उडता पंजाब सिनेमासाठी गेल्या दोन वर्षांपासून कठीण परिश्रम घेतले आहेत. दोन वर्षांची कठीण मेहनत, रक्त आणि आमचे गेलेले अश्रू व्यर्थ जाऊ देऊ नका, सर्वांनी कृपया थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पाहा, अशी कळकळीची विनंती आलिया भट्टने केली आहे.
https://twitter.com/aliaa08/status/743145808481005569
अभिनेता शाहिद कपूरने देखील ट्वीट करुन सिनेमा थिएटरमध्ये पाहण्याची विनंती केली आहे. बॉलिवूडच्या इतर कलाकारांनीही प्रेक्षकांनी हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहण्याची विनंती केली आहे. सर्व कलाकारांनी कठिण परिश्रम घेतले आहेत, त्याचं फळ त्यांना मिळावं, असे ट्विट बिपाशा बासू, करण जोहर, वरुण धवन, अर्जून कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा यांनी केले आहेत.
https://twitter.com/karanjohar/status/743137819485339648
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्राईम
निवडणूक
Advertisement