Udit Narayan: 1,2,3 किस बाई किस, उदित नारायण यांनी चौथ्या महिलेला लाईव्ह KISS केलं, चाहते चवताळले!
Udit Narayan Viral Video: 'मोहरा' चित्रपटातील 'टिप टिप बरसा पानी' हे लोकप्रिय गाणे गात असतानाच, उदित नारायण पुढे झुकून सेल्फी काढण्यासाठी एकामागून एक येणाऱ्या महिलांच्या गालाचे चुंबन घेताना दिसत आहेत.

Udit Narayan: ज्येष्ठ गायक उदित नारायण (Udit Narayan) यांचा एक व्हिडिओ आता चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये उदित नारायण (Udit Narayan) लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान महिला चाहत्यांना किस करताना दिसत आहे. त्यामुळे त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलचा सामना करावा लागत आहे. उदित नारायण (Udit Narayan) एकामागून एक असे तीन ते चार महिलांना किस करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. एका कार्यक्रमात, त्याच्या 'मोहरा' चित्रपटातील 'टिप टिप बरसा पानी' हे लोकप्रिय गाणे गात असतानाच, उदित नारायण (Udit Narayan) पुढे झुकून सेल्फी काढण्यासाठी एकामागून एक येणाऱ्या महिलांच्या गालाचे चुंबन घेताना दिसत आहेत.
सेल्फी घेतल्यानंतर यापैकी काही महिला पुढाकार घेत उदित नारायण यांच्या गालावर किस करताना दिसत आहेत. यावेळी तेथे उभे असलेले सुरक्षा कर्मचारी देखील महिलांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात, ज्यावर उदित नारायण (Udit Narayan) हावभावात पुरुष/महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांना असे करण्यास मनाई करताना दिसतात आणि महिलांना त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यास परवानगी देण्यास मला हरकत नाही, असं सुचवतात.
View this post on Instagram
व्हिडिओच्या शेवटी, उदित नारायण (Udit Narayan) दुसऱ्या महिलेसोबत फोटो काढत असल्याचे दिसत आहे आणि निघण्यापूर्वी ती महिला त्याच्या गालावर चुंबन घेत आहे. अशा स्थितीत उदित नारायणने आधी महिलेच्या एका गालावर चुंबन घेतले आणि नंतर पटकन तिच्या ओठांना स्पर्श केला आणि नंतर दुसऱ्या गालावर चुंबन घेतले. हे पाहून तिथे जमलेले चाहते एकत्रितपणे आवाज करतात आणि ती चाहती महिला हसत तिच्या बसण्याच्या दिशेने निघून जाते, उदित नारायण (Udit Narayan) गाणे चालू ठेवतात. ही मैफिल/कार्यक्रम कुठला होता आणि हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे हे सध्या तरी माहीत नाही. उदित नारायण (Udit Narayan) यांनी आपला फोन बंद केला असल्याची माहिती आहे.
नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
उदित नारायण यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावरती मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरती नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर उदित नारायण यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत व्हिडीओवर कमेंट करत आहेत. याशिवाय, हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर आणि रिशेअर केला जात आहे. त्यामुळे हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
मशहूर सिंगर उदित नारायण को तो आप जानते ही होंगे, अब उदित नारायण के एक कॉन्सर्ट की एक वीडियो वायरल है,
— Jaiky Yadav (@JaikyYadav16) February 1, 2025
इस वीडियो में उदित नारायण "टिप टिप बरसा पानी" गाने पर परफॉर्म कर रहे हैं, इसमें स्टेज के पास लड़कियां उनके साथ सेल्फी लेने आती हैं,
उदित नारायण उन्हें सेल्फी देकर उनके होंठों… pic.twitter.com/H9PLjGH4ZZ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
