(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rashmirekha Ojha : अभिनेत्री रश्मिरेखा ओझाची आत्महत्या; लिव-इन-पार्टनर कारणीभूत असल्याचा वडिलांचा आरोप
Rashmirekha Ojha : ओडिशातील अभिनेत्री रश्मिरेखा ओझाचे निधन झाले आहे.
Rashmirekha Ojha : गेल्या काही दिवसांत मनोरंजन क्षेत्रातील अनेक अभिनेत्री आत्महत्या करत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच ओडिशातील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिरेखा ओझाने (Rashmirekha Ojha) वयाच्या 23 व्या वर्षी आत्महत्या केली आहे. पोलिसांना तिचा मृतदेह मिळाला आहे. रश्मिरेखाच्या वडिलांनी तिच्या लिव-इन-पार्टनरवर आरोप लावले आहेत.
भाड्याच्या घरात मिळाला मृतदेह
मीडिया रिपोर्टनुसार, रश्मिरेखा ओझाचे स्वत:चे घर नव्हते. ती भुबनेश्वरमधील नायापल्लीमध्ये एका भाड्याच्या घरात राहत होती. या भाड्याच्या घरातच पंख्याला लटकलेला रश्मिरेखाचा मृतदेह सापडला आहे. दरम्यान रश्मिरेखाच्या वडिलांनी तिच्या लिव-इन-पार्टनर संतोषवर आरोप लावले आहेत. संतोषमुळेच रश्मिरेखाने आत्महत्या केली असा आरोप रश्मिरेखाच्या वडिलांनी केली आहे.
एफआयआर दाखल
सध्या पोलिस रश्मिरेखा ओझा आत्महत्या प्रकरणाचा तपास घेत आहेत. एफआयआरदेखील दाखल करण्यात आली आहे. वयाच्या 23 व्या वर्षी रश्मिरेखाने आत्महत्या केली आहे. सध्या पोलिस पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत. रश्मिरेखाला 'केमिती कहिभी कहा' या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली होती.
रश्मिरेखाचे वडिल काय म्हणाले?
रश्मिरेखाचे वडिल म्हणाले,"रश्मिरेखा ओझाने संतोष पात्रामुळेच आत्महत्या केली आहे. संतोषनेच तिला आत्महत्या करायला भाग पाडले आहे. शनिवारी रश्मिरेखाने आमच्यासोबत बोलण्यास नकार दिला होता. त्यानंतर संतोषनेच आम्हाला रश्मिरेखाच्या निधनाची बातमी सांगितली".
संबंधित बातम्या