एक्स्प्लोर

Abhishek Bachchan Aishwarya Rai : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात बिनसलं? घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

Abhishek Bachchan Aishwarya Rai : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात बिनसलं असून ते लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

Abhishek Bachchan Aishwarya Rai Divorced : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांच्यात बिनसलं असून ते आता लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे त्यांच्यात बिनसलं नसल्याचीदेखील चर्चा आहे. त्यामुळे चाहते आता गोंधळात पडले आहेत.

नेमकं प्रकरण काय? 

गेल्या काही दिवसांपूर्वी नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा उद्धाटन सोहळा पार पडला. या सोहळ्यात ऐश्वर्या राय बच्चन लेक आराध्यासह उपस्थित होती. पण अभिषेक बच्चनने या भव्यदिव्य सोहळ्यात हजेरी लावली नव्हती. याच कारणाने आता ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात बिनसलं असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. तसेच ते लवकरच घटस्फोट घेणार असल्याचीदेखील चर्चा आहे. 

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय 2007 साली लग्नबंधनात अडकले. त्यानंतर 2011 साली ऐश्वर्याने आराध्याला जन्म दिला. पण गेल्या काही दिवसांपासून अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये दुरावा आल्याची चर्चा आहे. तसेच ऐश्वर्या आणि आराध्या वेगळं राहत असल्याचंदेखील म्हटलं जात आहे. अद्याप त्यांच्या नात्याबद्दल दोघांनीही अधिकृतरित्या भाष्य केलेलं नाही. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shreya Bollywood 💫 (@bollywoodgalaxy_)

ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये बिनसलं असल्याची चर्चा याआधीदेखील झाली आहे. सुभाष घई यांच्या पार्टीतील अभिषेक आणि ऐश्वर्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या अभिषेकवर रागावलेली दिसत होती. त्याआधीदेखील मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या अभिषेककडे रागाने पाहताना दिसत होती. या व्हिडीओवर 'अनहॅपी रिलेशनशिप' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या होत्या. 

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय नेहमीच एकमेकांना खंबीर पाठींबा देताना दिसले आहेत. या 15 वर्षांच्या सोबतीत त्यांनी मिळून आयुष्यातील अनेक चढ-उतारांचा सामना केला आहे. आजही ही जोडी मनोरंजन विश्वातल्या आदर्श जोडप्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. अभिषेक आणि ऐश्वर्याचा शाही विवाहसोहळा पार पडला होता. त्यांच्या भव्य लग्नसोहळ्यात अवघं बॉलिवूड विश्व अवतरलं होतं. दोघांचाही मोठा चाहतावर्ग असून दोघांच्याही नात्यात आलेला दुरावा कमी व्हावा अशी इच्छा चाहते व्यक्त करत आहेत.

संबंधित बातम्या

Aishwarya Rai Bachchan: ...जेव्हा जया बच्चन करिश्मा कपूरला म्हणाल्या होत्या, 'ही माझी होणारी सून'; पाहा व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget