Upcoming Movies And Series : मे महिन्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; 'हे' वेब सीरिज आणि सिनेमे होणार प्रदर्शित
Upcoming Movies And Series : मे महिन्यात अनेक सिनेमे आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत.
![Upcoming Movies And Series : मे महिन्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; 'हे' वेब सीरिज आणि सिनेमे होणार प्रदर्शित these web series and movies will be released in May Upcoming Movies And Series : मे महिन्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; 'हे' वेब सीरिज आणि सिनेमे होणार प्रदर्शित](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/09/beabb4f5dd30d505171ea2da72efab7a_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Upcoming Movies And Series : कोरोना प्रादुर्भावामुळे सिनेमांची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने अनेक निर्माते त्यांचे सिनेमे प्रदर्शित करत आहेत. मे महिन्यात अनेक वेब सीरिज आणि सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानीच मिळणार आहे.
जयेशभाई जोरदार : जयेशभाई जोरदार (Jayeshbhai Jordar) हा सिनेमा 13 मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात रणवीर सिंहसोबत शालिनी पांडे दिसणार आहे. तर बोमन ईरानी आणी रत्ना पाठक या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन दिव्यांग ठक्करने केले आहे.
धाकड : 'धाकड' (Dhaakad) : कंगना रनौतच्या 'धाकड' सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 20 मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
भूल भुलैया 2 : 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) हा सिनेमा 20 मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात कार्तिक आर्यनसह कियारा आडवाणी आणि तब्बू महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
View this post on Instagram
हिट- द फर्स्ट केस : 'हिट- द फर्स्ट केस' या सिनेमाची कथा रंजक आहे. सान्या मल्होत्रा आणि राजकुमार राव या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 20 मे 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
अनेक : 'अनेक' (Anek) हा सिनेमा 27 मे रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात आयुष्मान खुराना पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे.
पंचायत : दीपक कुमार दिग्दर्शित पंचायत या वेब सीरिजचा दुसरा सीझन 20 मे रोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. जितेंद्र कुमार, नीना गुप्ता आणि रघुबीर यादव या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत.
स्ट्रेंजर थिंग्स : स्ट्रेंजर थिंग्स (Stranger Things) या वेब सीरिजच्या चौथ्या सीझनची प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. आता या वेब सीरिजचा चौथा सीझन 27 मे पासून प्रेक्षक नेटफ्लिक्सवर पाहू शकतात.
संबंधित बातम्या
Prithviraj Trailer : 'धर्म के लिए जी रहा हूँ , धर्म के लिए मरुंगा'; पृथ्वीराजचा जबरदस्त ट्रेलर
KGF Chapter 2 BO Collection : ‘केजीएफ 2’ची गाडी बॉक्स ऑफिसवर सुसाट! चौथ्या आठवड्यातही कोटींची कमाई!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)